*नव वर्षाच्या पुर्वसंधे ला धिंगाणा घालणार्यांची गय केली जाणार नाही – ठाणेदार चंद्रकांत काळे*

विशेष प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी- 31डिसेंबर व नव वर्षाच्या धिंगाणा घालनार्यावर कार्यवाही करण्यात येणार असून या कार्यवाही पासून वाचण्या साठी कोंढाळी पोलिसांकडून 25डिसेंबर पासूनच जनजागृती मोहीम राबविल्या जात असल्याची माहिती येथील ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी दिली आहे .
कोंढाळी पोलीस स्टेशन च्या वतीने येथील कोंढाळी वर्धा चौरस्ता, काटोल कोंढाळी टी पाॅईंट वर दुचाकी, चारचाकी वाहन धारकाचे वाहन तपासणी, हेलमेट वापरण्याची सुचना, दारू पिऊन वाहन चालणार्यावर कार्यवाही, वाहन चालकांचे वाहन चालक परवाने तपासनी अल्पवयीन मुलांकडून चालविण्यात येणारे अल्पवयीन मुलांचे पालकांना सुचना देणे या सारखे कार्यक्रम राबवून येणारे 31डिसेंबर 2021 व 01जानेवारी 2022 चे रात्री राज्य प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावली अंतरगत व कोविड 19च्या दिशा निर्देशांचे पालन करण्या संबधी 25डिसेंबर पासून जन जागृती करण्यात येत आहे.

या जन जागृती प्रसंगी कोंढाळी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस उप निरिक्षक, सहायक उप निरिक्षक, हवालदार म पो शि, ना पो शी या सर्व पोलीस कर्मचारीवर्गा कडून जन जागृती करण्यात येत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज