*सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूलची निधी बल्लारे महाराष्ट्रात प्रथम देशात पाचवी*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
कोराडी:- ऊर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियान 2021अंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सरस्वती भवन कॉन्व्हेंट अँड हायस्कूल बोखारा वर्ग 7 वी ची विद्यार्थिनी निधी मनोहर बल्लारे गट अ मध्ये हिने प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हास्तरीय स्पर्धेत 1250 विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक पटकावून तिची राज्य स्तरावर निवड झाली व राज्य स्तरावर सुद्धा प्रथम क्रमांक पटकविल्याने तिची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली .दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेत तिने पाचवा क्रमांक पटकविला. राज्य सरकारने घोषित केलेले 50000 हजाराचे पारितोषिक निधीला मिळाले. नागपूर जिल्ह्याचे नाव लौकिकास आणणारी कुमारी निधी बल्लारे ही सरस्वती भवन कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी हिने महाराष्ट्राचे नाव केंद्र स्तरावर लौकिकास आणल्यामुळे संस्थेच्या संचालिका सौ लता वाघ, संचालक सचिव डॉक्टर मारुती वाघ ,संस्थेचे सदस्य पर्यवेक्षक प्रा. वसंत हिवरकर, सरस्वती भवन कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका केरेन यंगड ,सरस्वती भवन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा फिलिप्स , तसेच इतर शिक्षकवृंदानी तिचे कौतुक केले व भावी आयुष्याकरिता तिला शुभेच्छा दिल्या.
Maharashtra News Media सच की आवाज