*कन्हान येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी*
*दणका युवा संघटन व कन्हान शहर विकास मंच च्या संयुक्त शिबीरात ३० दात्याचे रक्तदान*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – भारत देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी च्या ९७ व्या जयंती निमित्य दणका युवा संघटन महाराष्ट्र व कन्हान शहर विकास मंच च्या संयुक्त विद्यमाने पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.

शनिवार दिनांक.२५ डिसेंबर ला देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत पंचायत श्री हनुमान मंदिर गांधी चौक, पोलीस स्टेशन जवळ कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित दणका युवा संघटन संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे व कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबीर कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली असता डॉ हेडगेवार रक्तपेढी संकलन केंद्राचे किरण इंगळे, कल्पना काळे, प्रियंका पवार, अनुप कापटे, प्रणाली शेंडे आदीच्या चंमुच्या सहकार्या ने ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन रक्तदात्यांना बँग, प्रमाणपत्र व खाद्य सामग्री देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, जेष्ठ पत्रकार मालविय सर, उपाध्यक्ष कमलसिंग यादव, पत्रकार धंनजय कापसीकर, विवेक पाटील आदिं ना पुष्पगुच्छ, बँग देऊन सत्कार करून स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांची ९७ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे, महामार्ग पोलीस सहायक निरिक्षक दिपक काॅंक्रेटवार, भाजप ओबीसी मोर्चा चे रामभाऊ दिवटे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, राजेश यादव, विनय यादव, नगरसेविका गुंफा तिडके,खंडाळा ग्रा पं सदस्य रविंद्र केने, महिला कार्यकर्ता तुलेषा नानवटकर ,वर्षा सिंगाडे, अजय लोंढे, भरत सावळे, महेंन्द्र चव्हाण, प्रशांत मसार, सचिन वासनिक, मयुर माटे , किरण ठाकुर , विनोद कोहळे, संजय चहांदे, दिपक तिवाडे सह नागरिक बहु संख्येत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता दणका युवा संघटन संस्थापक अध्यक्ष योगेश वाडीभस्मे, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर , दणका युवा जिल्हाध्यक्ष महेश कारेमोरे, शहराध्यक्ष सुरेश वैद्य, पारशिवनी तालुका शैलेश शेळके, मौदा तालुका विरेंन्द्र पायतोडे, दणका कन्हान विनोद किरपान, दिनेश नानवटकर कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव हरीओम प्रकाश नारायण, महासचिव सुरज वरखडे, कोषाध्यक्ष महेश शेंडे, रिंकेश चवरे सह आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज