*कन्हान ला भाजपा द्वारे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित भाजपा पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
शनिवार दिनांक २५ डिसेंबर ला देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९७ व्या जयंती निमित्य भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे व भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा नागपुर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष शालीनी बर्बे , भाजपा नागपुर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष रिंकेश चवरे , पारशिवनी तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , महामंत्री अमिश रुंघे , तालुका अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री मयुर माटे , महामंत्री सचिन वासनिक , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , उपाध्यक्ष मनोज कुरडकर , महामंत्री सुनील लाडेकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रांत सोलंकी , शहर महिला अध्यक्ष तुलेषा नानवटकर , महामंत्री सुषमा मस्के , अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष संजय रंगारी , उपाध्यक्ष दिपनकर गजभिए , महामंत्री अजय लोंढे , कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका अनिता पाटील , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके , शहर प्रसिद्ध प्रमुख रुषभ बावनकर , विनोद कोहळे , अमन घोडेस्वार , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज