Breaking News

*सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन*

*सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – आधुनिक युगात सुध्दा पिपरी-कन्हान येथील मसार सयुक्त परिवारातील सयुक्त कुंटुब पध्दतीचे पुरस्कर्ते पुरूष श्री कृष्णाजी लक्ष्मणजी मसार यांचे वृध्पकाळाच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.


कन्हान गांधी चौकात सायकल दुरूस्तीचे दुकान व खेडी (गहुहिवरा) येथे शेती करणारे श्री बाजीरावजी व कृष्णाजी मसार हे दोन्ही भाऊ परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यात मोठे भाऊ बाजीरावजी मसार यांचे २००३ म्हणजे १८ वर्षा पुर्वी निधन झाले. तरी श्री कृष्णाजी मसार हे त्यांचे तीन मुले व दोन मुली आणि मोठे भाऊ बाजीरावजी यांचे तीन मुले, दोन मुली यात चार बहीणी आणि पाच भावाचे विवाहीत असुन फक्त लहान मुलगा प्रंशात मसार चा विवाह होणे बाकी आहे . आजही कन्हान परिसरातील पिपरी शहरात वहिणी, पत्नी, मुले, सुना व नातु, नातीण सह एकुण २५ सदस्य एकाच घरी सयुक्त कुंटुब पध्दतीने राहत असतात. या आदर्श सयुक्त कुंटुबाचे चालक श्री कृष्णाजी मसार यांचे सोमवार (दि.२०) डिसेंबर ला सकाळी ९ वाजता राहत्या घरी वृध्पकाळाने दु:खद निधन झाले. त्याची अंतिम यात्रा राहते घर पिपरी येथुन सायंकाळी ४ वाजता काढुन कन्हान नदीच्या पिपरी शांती घाटावर सामुहीक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आला.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …