Breaking News

*जुनी कामठी (गाडेघाट) शिवारात बिबटयाने कानपुरी कारवळ व कुत्र्याच्या पिल्याला केले ठार* *कन्हान, पेंच नदी किनारा शिवारात बिबटया येत असल्याने गावांच्या नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण*

*जुनी कामठी (गाडेघाट) शिवारात बिबटयाने कानपुरी कारवळ व कुत्र्याच्या पिल्याला केले ठार*

*कन्हान, पेंच नदी किनारा शिवारात बिबटया येत असल्याने गावांच्या नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुकातील पेंच व कन्हान नदी काठाजवळील शेतात बिबटया येऊन शेतातील प्राळी व जनवारांची शिकार करित असुन जुनीकामठी ग्रामपंचायत अंतर्गत गाडेघाट गावा जवळील शेतशिवाराती गोठया तील बांधलेली कानपुरी कारवळ व कुत्र्याच्या पिल्याची शिकार करून ठार केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पंचायत समिती पारशिवनी सभापती सौ कावळे यांच्या रहिवासासी ग्रामपंचायत जुनीकामठी अंतर्गत गाडेघाट येथील गावालगत शेतशिवारातील अतुल खंते यांच्या शेतातील गोटयात रविवार दिनांक.२६ डिसेंबर ला रात्री ८ ते ९ वाजता प्राळीव जनावरे बांधुन घरी येऊन नियमित प्रमाणे सोमवार दिनांक.२७ ला सकाळी शेतात येऊन जनावरांना चारा पाणी करतांना त्याना कानपुरी कारवळ न दिसल्याने आजुबाजुला पाहीले असता ती दिसुन न येता गोटयाजवळ रक्त दिसल्याने त्या दिसेने जाऊ न पाहीले असता काही लांब तुरी मध्ये तिचा माग चा भाग खाऊन मृत अवस्थेत आढळल्याने आजुबाजुच्या शेतकऱ्यांना बोलाविले असता काही अंतरावर कुत्र्याचे पिल्लु मृत दिसुन बिबटयाच्या पायाचे ठसे दिसल्याने रात्री बिबटयाने शिकार करून कानपुरी गाबण कारवळ व कुत्र्याच्या पिल्ल्याची बिबटयाने शिकार करून ठार केल्याचे निर्देशनात आल्याने गावातील उपसरपंच राहुल ढोके , रामभाऊ दिवटे ,व सामाजिक कार्यकर्ते पारस यादव यांच्या मदतीने वनविभागास फोन वर पेच व्याघ्र प्रकल्प रामटेक वन परिक्षेत्राचे एस जे टेकाम यांना माहिती दिल्याने तात्काळ वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटनेची माहीती वरिष्ठ अधिकारी वन क्षेत्र सहायक द्विग्रेसे साहेव यांना देऊन त्याच्या आदेशानुसार वनरक्षक एस जे टेकाम, रोपवन रक्षक अशोक ठाकरे, पुरूश्तोम मेश्राम यांनी घटना स्थळी पोहचुन निरिक्षण करून पंच १) राहुल गोपीचंद ढोके (उपसरपंच), २) पारस रमेशचंन्द्र यादव (सामाज सेवक) या पंचाच्या साहयाने पंचनामा करून शवाविच्छेदन पंचायत समिती पारशिवनी वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी यांनी पंचनामा करून अहवाल वन विभागाचे अधिकारी याना पाठविणार आहे.


ग्राम पंचायत जुनिकामठी उपसरपंच राहुल ढोके, समाज सेवक पारस यादव व गावक-यानी पिडीत शेत करी अतुल खंते यांची कानपुरी गाभण कारवळ ही बिबटयाच्या शिकारीत ठार होऊन त्यांचे बाजार भाव प्रमाणे अंदाजे मृत कारवळ ची किंमत २४ हजार ७०० रुपयाचे नुकसान झाल्याने शेतक-याला शासनाने नुक सान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी पेंच व कन्हान नदी पात्राच्या किना-याने येऊन दोन्ही नदी काठालगत असलेल्या गावालगत शेतशिवारातील प्राळीव प्राण्या ची शिकार करण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत अस ल्याने या नदी काठालगतच्या नयकुंड, मेहंदी, बखारी, पिपळा, गवना, गरंडा, वाघोडा, नांदगाव, एंसबा, घाट रोहना डोरली, बिना, जुनिकामठी, गाडेघाट, पिपरी आदी गावक-यात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने पेंच वन व्याघ्र प्रकल्पाच्या व वन विभागाच्या अधिका-याने त्वरित योग्य कार्यवाही करून परिसरातील ग्राम स्थाना भितीच्या वातावरणातुन मुक्त करावे. अन्यथा ग्रामस्थाना वनविभागाच्या विरोधात जन आंदोलन करावे लागेल. अश्या चर्चेला जोमात ऊत येत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …