*सिहोरा घाट व केरडी फाटा येथुन अवैधरित्या रेती वाहतुक करणारे दोन ट्रक पकडले*
*दोन्ही ट्रक चालक व मालका विरूध्द माईनिगं एक्ट नुसार कारवाई करित ४,६४,००० रूपयाचा दंड*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पारशिवनी तहसिल कार्यालय महसुल विभागाचे तहासिलदार प्रशांत सागंड़े यांच्या रात्री ग्रस्त पथकाने पेट्रोलिंग करताना कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सिहोरा रेती घाटातुन विनापरवाना अवैधरित्या रेती वाहतुक करतांना ट्रक पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला जप्त केला. तर दुसरा रेती भरलेला ट्रक केरडी फाटया वर पकडुन तहसिल कार्यालयात लावुन दोन्ही ट्रक वर अवैद्यरित्या विना परवाना रेतीची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालक व मालक यांचे वर मायनिंग एँक्ट नुसार कारवाई करून ४,६४,००० रूपयाचा दंड आकारण्यात आला आहे.
महसुल विभागाच्या सुत्रा कडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक.२१ डिसेंबर ला पारशिवनी महसुल विभागाच्या पथकाने रात्री पेट्रोलिंग करीत असतांना कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान नदी सिहोरा रेती घाटावरून ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ०३६५ मध्ये चालक अवैद्यरित्या विना परवाना रेती चोरून वाहतुक करताना मिळुन आल्याने कारवाई करित रेती भरलेला ट्रक कन्हान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. त्याच रात्री बुधवार दिनांक.२२ ला पहाटे सकाळी पेट्रोलिंग करित पारशिवनी कडे जात असतांना राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील केरडी फाटयावर ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ७७७६ ला थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये रेती आढळुन आल्याने ट्रक चालकास विचारपुस केली असता ट्रक चालक विना परवाना अवैद्यरित्या रेती चोरून वाहतुक करतांना आढळुन आल्याने महसुल पथकाने तहासिल कार्यालय पारशिवनी ला नेऊन ट्रक जप्त करित चालक व मालक यांचे वर कारवाई करण्यात आली.
महसुल विभाग रात्रपाळी पथकाने मंगळवार दिनांक.२१ डिसेंबर ला रात्री व बुधवार दिनांक.२२ डिसेंबर २०२१ च्या पहाटे सकाळी तहसिलदार मा. प्रशांत सागंडे व ग्रस्त पथकाने पेंट्रोलिंग दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान नदीच्या सिहोरा रेती घाटातुन ट्रक मध्ये अवैद्यरित्या रेती चोरून वाहतुक करताना मिळुन आल्याने ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ०३६५ ला जप्त करून चालक व मालकावर कारवाई करून २,३२,००० रूपयांचा दंड करण्यात आला. तसेच ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ७७७६ ला सुध्दा जप्त करून ट्रक चालक व मालका विरूध्द कारवाई करून २,३२,००० रूपयाचा दंड आकारण्यात आला. सदर कारवाई पारशिवनी चे तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्गदर्शनात तलाठी संकेत पालादुरकर, तलाठी चौहान, तलाठी माने, केातवाल सेवक भोंडे आदीनी करून दोन्ही ट्रक जप्त करित चालक व मालक यांचे विरूध्द मायनिंग एँक्ट अन्वये कारवाई करून एकुण ४,६४,००० रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.