*पोलिसांच्या सतर्कतेने बचावले कत्तलखान्यात जाणाऱ्या 30 गौवंशचे प्राण*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांना गौवंशाची अवैध रुपाने होत असलेल्याची गोपनीय माहिती मिळताच आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सावनेर काटोल मार्गावरील मोहपा फाट्यावर नाकाबंदी करुण CG 04 JB 1573 क्रमांकाच्या संशयास्पद ट्रकची तलाशी घेतली असता त्यात 26 गाई व 4 बैल अश्या एकुण 30 जनावरांना अमानुष रित्या त्यांच्या गळा व पायाला दोरानी बांधून असल्याचे निदर्शनास येताच त्यांचेवर कारवाई करण्यात आली.

*सदरच्या कारवाईत 26 गाई,4 बैल व जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत मिळुन एकुण 22 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज जप्त करुण सदर गौवंशाची पुढील उपचार व संगोपनासाठी श्री कु्ष्ण भगवान गौरक्षण संस्था गोंडेगाव तालुका नरखेड येथे रवाना करण्यात आले असुन ट्रक चालकाविरुध्द सावनेर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांना निर्दयतेची वागणूक प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम (11) (घ),(ड),(च) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1965 सह कलम 5 (अ) 9 सहकलम 119 मपोका नुसार गुन्ह्यांची नोंद करूण पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरिक्षक आशिषसिंग ठाकूर तपास करीत आहे.
*सदर कारवाई मा.विजयकुमार मगर पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण,मा.राहुल माकणीकर अप्पर पोलीस अधिक्षक नागपुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन सदर कारवाईत सहाय्यक फौजदार अनिल तिवारी,पोलीस हवालदार दिनेश काकडे,पोलीस सीपाई रवींद्र भलावी आदिंनी सहभाग घेतला*
Maharashtra News Media सच की आवाज