Breaking News

*कोळसा खदान ला ट्रक पार्किंग करतांना कपाळा वर लोखंडी हातोडी मारून जख्मी केले* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा*

*कोळसा खदान ला ट्रक पार्किंग करतांना कपाळा वर लोखंडी हातोडी मारून जख्मी केले*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम भागास कामठी खुली कोळसा खदान येथे ट्रक लावत (पार्किंग) करित असतांना आरोपीने शिवीगाळ करून कपाळावर लोखंडी हातोडी मारून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार धर्मेंद्र भावनाथ शाह वय ३५ वर्ष राहणार. वृंदावन लाॅन टेकाडी कन्हान हा ट्रक चालक असुन तो कामठी खुली कोळसा खदान येथे दोन वर्षा पासुन ट्रक चालवित असुन रविवार दिनांक.२६ डिसेंबर २०२१ ला पहाटे सकाळी ३ ते ३:१५ वाजता दरम्यान धर्मेंद्र भावनाथ शाह हा कामठी खुली कोळसा खदान येथे ट्रक लावत (पार्किंग) असतांना आरोपी ट्रक क्रमांक एम एच ४० वाय ३०६४ चा चालक टेकचंद याने धर्मेंद्र शाह ला शिविगाळ करीत असतांना त्यास शिविगाळ करू नको असे म्हटले असता टेकचंद ने शिविगाळ करीत धर्मेंद्र शाह च्या कपाळावर लोखंडी हातोडी मारून जख्मी केले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी धर्मेंद्र शाह यांच्या तक्रारी वरून व डॉक्टर च्या अहवाला वरून आरोपी टेकचंद विरुद्ध कलम ३२४, ५०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …