*बेघरांना हक्काचे घर मिळावे यासाठी भूखंड वाटप – मंत्री सुनील केदार*
*महाआवास योजने अंतर्गत सावनेर येथे 67 तर कळमेश्वर 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वितरण*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः गरीब व बेघर गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील 160 बेघरांना हक्काचे घर मिळावेत, यासाठी आज पशुसंवर्धन दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार याच्या हस्ते पंचायत समिती सावनेर च्या प्रांगणात भूखंड प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.*
*‘सर्वांसाठी घरे’ महाआवास अभियान 2022 अंतर्गत सावनेर पंचायत समिती येथे तालुक्यातील 67 बेघर लाभार्थ्यांना व कळमेश्वर येथे 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,*
*याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पंचायत समितीच्या सभापती ,उपसभापती पंचायत समिती कळमेश्वर सभापती, उपविभागीय अधिकारी अतूल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, सचिन यादव ,गटविकास अधिकारी दिपक गरुड,जिल्हापरिषद सदस्य प्रकाश खापरे,पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे,राहुल तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.*

*याप्रसंगी बोलताना मंत्री केदारांनी प्रताप वाघमारे तहसीलदार सावनेर तसेच सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिपक गरुड यांच्या नियोजनबद्ध धोरणामुळे सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा पोहचत असुन त्याचा लाभ मीळत असल्याचे तसेच गावात ज्यांना घरकुल नाही अशांनी तात्काळ मागणी करावी, त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त करत. गरीबांच्या समस्या सुटत नाही याची खंत वाटते, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हापरिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच आदीसोबतच जनप्रतिनिधीने पुढाकार घ्यावा असे निवेदन करत त्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रशासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल. शासन निर्णयानुसार लोकांना भूखंड उपलबध करुन देऊ, असा विश्वास मंत्री सुनील केदार यांनी संबोधनातुन व्यक्त केले*

*सोबतच सावनेर मतदार संघातील 3512 भूखंड प्रकरण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने निकाली काढण्यात येईल. पंचायत समितीने बैठक घेऊन त्याबाबत आढावा घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच गरीबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राशनकार्ड तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कामास सरपंच व उपसरपंचानी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.*
*नागपूर जिल्हयातील मतदार यादीचे पुनरीक्षण कार्यक्रमात सावनेर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.त्याचप्रमाणे इतरही कामास गती देण्याचे त्यांनी सांगितले. पानंद रस्त्याचा आराखडा तयार करा त्यास शासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. गारपिट व पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाईची मदत लवकरच देण्यात येईल, असाही विश्वास याप्रसंगी व्यक्त केला*
*यावेळी सावनेर तालुक्यात 67 व कळमेश्वर तालुक्यात 93 बेघर लाभार्थ्यांना भूखंड मंजूरी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिपक गरुड यांनी केले कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील बेघर लाभार्थी, सरपंच व उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज