Breaking News

*कन्हान येथे १ जानेवारी शौर्य दिवस थाटात साजरा* *विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे १ जानेवारी शौर्य दिवस थाटात साजरा*

*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात १ जानेवारी शौर्य दिवस निमित्य विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्प अर्पित करुन व मानवंदना देऊन शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला .

*भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा*

कन्हान : – १ जानेवारी शौर्य दिवसा निमित्य भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार दिनांक.१ जानेवारी २०२२ ला भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे शौर्य दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबा साहेब आबेंडकर चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मिल्ट्रीमॅन रिटायर्ड सुबेदार मेजर जगदीश कानेन्हकर, रिटायर्ड हवलदार रमाकांत पानतावने, नायक जय पाटिल, नायक विलास मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्पहार अर्पण करून, क्रांती मशाल प्रज्वलित व पुष्पचक्र अर्पित करून बुध्द वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात ट्रेडिश नल इंस्टिट्यूट ऑफ शोतो कराटे एसोसिएशन, जापान कराटे एसोसिएशन चे खेळाडुंनी मास्टर रिदम शेंडे च्या नेतृत्वात ब्लैक बेल्ट धारी मनोज बर्वे, रोशन बर्वे, अमर सोनेकर, हर्षित रायपुरकर, नैतिक खंडाईत, नैपुण्य खंडाईत,माही शेंडे, आराध्या सेंगर, मानव शेंडे सह चंमुनी कराटे प्रस्ताविक सादर केले. त्यानंतर मार्गदर्शन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत संख्येने उपस्थित होते .

*सर्व धर्म समभाव संघटन द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा*

कन्हान : – सर्व धर्म समभाव संघटन द्वारे शौर्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रिटायर्ड सूबेदार मेजर जगदीश कानेन्हकर, रिटायर्ड हवलदार रमाकांत पान तावने, नायक जय पाटिल, नायक विलास मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व धर्म समभाव संघटन अध्यक्ष चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, प्रशांत मसार, राजेंद्र फुलझले, नितिन मेश्राम, राॅबिन निकोसे सह नागरिक उपस्थित होते.

*भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा*

भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे शौर्य दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे व नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी भीमा कोरेगांव विषया वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे, तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, तालुका महामंत्री सचिन वासनिक, मयुर माटे, भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शैलेश शेळके, नगर सेवक राजेंद्र शेंदरे, भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर उपाध्यक्ष दिपनकर गजभिये, अमन घोडेस्वार सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …