*कान्द्री ग्रामपंचायत येथे संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री ग्रामपंचायत येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने मान्यवरांचा हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ ला संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन कांद्री ग्रामपंचायत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन महाराजांनी केलेल्या कार्यावर उपस्थितीतांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व कांद्री ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत जगनाडे महाराज यांची पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कांद्री ग्रामपंचायत उपसरपंच शयाकुमार बर्वे , सदस्य धनराज कारेमोरे , प्रकाश चाफले , शिवाजी चकोले , चंद्रशेखर बावनकुळे , ग्रामपंचायत सदस्या दुर्गाताई सरोदे ,आशाताई कनोजे , गजानन हटवार ,गणेश सरोदे , अभय जांबूतकर , विवेक वांढरे ,विलास कवडे सह आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत येथील कर्मचारी प्रामुख्यानेउपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज