Breaking News

*कांन्द्री – कन्हान परिसरात दोन कोरोना पॉझीटिव्ह आढळले*

*कांन्द्री – कन्हान परिसरात दोन कोरोना पॉझीटिव्ह आढळले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांद्री येथील एक ५० वर्षीय पुरूष रूग्ण पॉझीटिव्ह आला. तर नागपुर खाजगी रूग्णालयाच्या तपासणीत कोळसा खदान नं.३ मश्जिद जवळील एक २९ वर्षीय महिला अश्या दोन कन्हान परिसरातील रूग्णाचा तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आढळुन आल्याने त्यांना त्यांच्या घरीच कोरंटाईन करून त्यांचा उपचार सुरू आहे.
रविवार दिनांक.२ जानेवारी ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना तपासणीत कांद्री येथील एक ५० वर्षीय पुरूष रूग्ण पॉझीटिव्ह आला. तर नागपुर खाजगी रूग्णालयाच्या तपासणीत कोळसा खदान नं. ३ मश्जिद जवळील एक २९ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझीटिव्ह असे कन्हान परिसरातील दोन रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आल्याने त्यांना होम कोरंटाईन करून दोन्ही बाधीतांचा उपचार सुरू आहे.
कोरोना रूग्णाची संख्या कमी झाल्यानंतर गत काही दिवसा पासुन कोराना रूग्ण वाढत असुन ओमिक्रॉन व्हेरियंट चा सुध्दा धोका सामोर असल्याने भाजिपाला विक्रेता, हाथठेला वरून फळ विकणारे, दुध विक्रेता तसेच सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकां च्या संपर्कात येणाऱ्या व्यकती, नागरिकांनी स्वयंफुर्त लसीकरण करून घावे आणि शासनाच्या निर्बधाचे काटेकोर पणे पालन करित हाथ वारंवार स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे, नियमित मास्क चा वापर करावा. असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी हयानी केले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …