पांढरपौणी येथे शेतकरी संघटनेत युवकांची मोठी इनकमिंग  २७ युवकांनी घेतला शेतकरी संघटनेत प्रवेश

पांढरपौणी येथे शेतकरी संघटनेत युवकांची मोठी इनकमिंग
 २७ युवकांनी घेतला शेतकरी संघटनेत प्रवेश

आवारपूर  प्रतिनिधि-गौतम धोटे

राजूरातालूक्याती पांढरपौवणी येथे शेतकरी संघटनेत युवकांची मोठी इनकमिंग २७ युवकांनी घेतला शेतकरी संघटणेत नुकताच प्रवेश
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार नसताना आपल्या कार्यसुचितेच्या जोरावर सर्वसामान्य लोकांच्या पाठिंब्याने अ‍ॅड. वामनराव चटप यांना ५७ हजार ७२७ इतके मताधिक्य मिळाले. केवळ २३४३ मतांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला असला तरी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत नव्याने काम करण्याची उर्मी निर्माण झाली आहे. पराभवाने खचून न जाता चारही तालुक्याचा दौरा नुकताच अ‍ॅड. चटप यांनी केला. ओला दुष्काळ जाहिर करावा, नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत मिळावी, नाफेडची खरेदी केंद्र सुरु व्हावी, यासह विविध जनहिताच्या मागण्यांसाठी अ‍ॅड. चटप यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला आहे. अजूनही जिद्दीने जनहितासाठी लढण्याची शैली व ग्रामीण भागातील प्रश्नांची असलेली जाण यातून मोठ्या प्रमाणात युवक अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह जुळत आहेत. सास्ती, धोपटाळा, कोहपरा येथील शेकडो युवकांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केल्यानंतर आता पांढरपौणी येथील पद्माकर घोगरे, मधुकर उमरे, मोरेश्वर वैरागडे, विकास बटारकर, शंकर मेश्राम, प्रकाश बावनकर, प्रफुल खनके, दत्ता कवडगावे, अमोल मोरे, शालिक आत्राम, अनिल आत्राम, कैलाश आत्राम, चेतन धानोरकर,मारुती निब्रड, रमेश इग्रपवार, राजकुमार इग्रपवार, संतोष चन्ने, गणपत शेरकी यांच्यासह २७ युवकांनी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला आहे. यावेळी प्रभाकर दिवे, अनिल ठाकुरवार, प्रभाकर ढवस, अ‍ॅड. दीपक चटप, दिलीप देरकर, मधु चिंचोलकर, केतन जूनघरे, कपिल इद्दे, नरेंद्र मोहारे, नरेंद्र काकडे, आनंदराव वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …