Breaking News

*अनाथांची माई सिधूताई सपकाळ यांच्या सहवासातील अविस्मरणीय क्षण*

*अनाथांची माई सिधूताई सपकाळ यांच्या सहवासातील अविस्मरणीय क्षण*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः जेष्ठ समाजसेवी,आनाथांच्या माई सिधूताई सपकाळ यांचे काल सायंकाळी दुर्धर आजाराने आकस्मिक निधन झाले आणी हजारो हजार मुलें एकच पोरकी झाली.आणी क्षणातच त्यांची माई हरपली.*

 

*जेष्ठ समाजसुधारक सिधूताई सपकाळ 2 आक्टोंबर 2019 गांधी जयंती निमित्ताने शहरातील समाजसेवी गोपाल घटे यांच्या व्दारे आयोजित दांडी यांत्रेच्या आयोजनात प्रामुख्याने उपस्थित होत्या.*


*आनाथांच्या माईचे शहरात आगमन होत असल्याने माईचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी सावनेरकरच नव्हे तर पंचक्रोशीतील लेकरांनी एकच गर्दी केली व माईंचे दर्शन,आशिर्वाद व मोलाचे मार्गदर्शनासोबतच समाजसेवा काय व खरा समाजसेवी कसा असावा हे सावनेरकरांनी प्रत्यक्ष अनुभवले.*

 

*माईला त्यांच्या समाजकार्य करिता देशाचे सर्वोच्च “पद्मश्री पुरस्कार”,बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,महाराष्ट्र शासनाचा “अहिल्याबाई होळकर पुरस्कार” सारख्या जवळपास 750 च्या वर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अश्या आम्हा सर्वांच्या माई आज मामच्यात नाही यावर विश्वासच बसत नाही.*


*माई आज आपल्यात नसुन आजपासून त्या अनंत प्रवासावर निघाल्या असुन आता त्यांच्या फक्त स्मृतीच शेष आहेत.*

*माईच्या स्मृतीतील,माई सहवासातील 2 आक्टोंबर 2019 रोजी आमचे स्थानिक प्रतिनिधींने घालवलेला एक अविस्मरणीय क्षण.*

*अश्या थोर समाजसुधारक माईला महाराष्ट्र न्युज मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली…*
*माई मीस यू…*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …