Breaking News

*कन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती चे औचित्य साधुन पत्रकार दिवस थाटात साजरा* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती चे औचित्य साधुन पत्रकार दिवस थाटात साजरा*

 

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्त पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्रा च्या समोर ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण , व पुष्प अर्पित करुन तसेच सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करुन पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला .


गुरुवार दिनांक ६ जानेवारी ला मराठी पत्रकारितेचे दर्पण कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जयंती निमित्त शहर विकास मंच द्वारे पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्रा च्या समोर ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्री मालवीय सर व प्रमुख अतिथि नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे , प्राथमिक आरोग्य केंन्द्रा चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित ऊंटखाना नागपुर चे नवनिर्वाचित अध्यक्ष व बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ श्रीमती विशाखा ठमके , शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवना वर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व सर्व पत्रकार बांधवांना फाईल , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना अल्पोहार वितिरित करुन पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला .


या प्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे , उपाध्यक्ष कमलसिंग यादव , सचिव सुनिल सरोदे , कोषाध्यक्ष रवि दुपारे , भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान चे शिक्षिका वर्षा सिंगाडे , पत्रकार सदस्य गणेश खोब्रागडे , रोहित मानवटकर , आकाश पंडितकर , निलेश गाढवे , सह आदि पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सहसचिव सुरज वरखडे , हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकार्यांनी सहकार्य केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …