*कोंढाळी वनपरिक्षेत्रात काटेरी कुंपणात अडकून पाच वर्षांचे अस्वल मृतावस्थेत आढळले*

कोंढाळी – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 01 जानेवारी 2022 पहिल्याच पहाटेला कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कोंढाळी उपवनाच्या पांजरा काटे या गावालगतच , पाच वर्षांचा (नर अस्वल) ले आउट च्या काटेरी कुंपणाच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.. कोंढाळी येथील पांजरा काटे बिट या गावाला लागून असलेल्या खासगी ले-आऊटमध्ये एक जानेवारी च्या पहाटेअस्वलाचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांजरा काटे गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर खाजगी ले-आऊट मधे प्लेटिंगचे काम सुरू असून, या ले-आऊटधारकाने सुरक्षेसाठी हा ले-आऊट चे चहूदिशांना काटेरी कुंपण (पाच लेनचे) घालण्यात आले आहे. 01 जानेवारी रोजी पांजरा काटे येथील काही जण आपापल्या शेता कडे जात असताना येथील ले-आऊटच्या तारांमध्ये अस्वल अडकून पडल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांना देण्यात आली, वन अधिकार्यानी घटनेची खात्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व उप वनपरिक्षेत्र अधिकारी कापगते उपवन अधिकारी एफ.बी.पठाण, वनरक्षक एन.डी.सोमकुवर वाय.टी.नापते यांनी पांजरा काटे गावात पोहचून, लगतच्या लेआऊट च्या काटेरी कुंपणाच्या तारांमध्ये सुमारे चार पाच वर्षांचे अस्वल अडकून मृतावस्थेत पडले दिसले. या घटनेची माहिती ए सी एफ प्रज्योत पालवे यांना देण्यात आली, त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून स्थानिय पंचा समक्ष मृत अस्वलाचे सर्व अवयवांची (नखे केस दात) तपासणी केली. मृत अस्वलाचे अवयव बरोबर आढाळले. ह मृत अस्वल ले आऊट मधून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात त्याचे तोंड कुंपनाचे काटेरी तारात अडकल्याने तोंडात खोलवर गंभीर जखमें मुळे अस्वलाचे तोंड रक्ताळलेले असल्याने मृत्यू झाला असावा असे वन अधिकारी प्रज्योत पालवे यांनी सांगितले.
अस्वल शेड्यूल एक मधे येत असल्याने त्याचे शव विच्छेदन तिन पशुवैद्यकिय अधिकारी यांचे पैनल द्वारा करण्या साठी मृत अस्वलाला नागपुर येथे नेन्यात येत असून शवविच्छेदनना नंतर वनविभागाचे जागेत मृत अस्वलाला वन विभागाने घालून दिलेल्या नियमावली अंतरगत जाळण्यात येणार असल्याचे ही उप विभाग वन काटोल उपविभागीय वन अधिकारी प्रज्योत पालवे यांनी माहीती दिली आहे, घटना स्थळी पांजरा काटे पोलीस पाटील , ले आऊट चे संचालक,
वन कर्मचारी नंदु धोटे, ममराज चव्हाण,किशोर कुसळकर पुंडलिक सरोदे, राठोड वनरक्षक हाजर होते.
Maharashtra News Media सच की आवाज