*आंदोलनात सहभागी असणाऱ्या एस,टी, कर्मचाऱ्यांचे हृदय विकाराने मृत्यू*

*रामटेक आगार येथील घटना*
रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – सद्या संपूर्ण महाराष्ट्रभर विलनीकरणासाठी एस,टी, कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.राज्यभरात आतापर्यंत जवळपास 67 कर्मचाऱ्यांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत.अशातच दि.07 जानेवारी 2022 ला दुपारी 4 वाजता रामटेक तालुक्यातील आगारामध्ये कार्यरत चालक श्री.किशोर तराळे वय 58 वर्ष.रा.रामटेक.यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

बातमीचे सविस्तर वृत्त असे की,जेव्हा पासून एस.टी. कर्मचाऱ्यांचे विलनिकरणासाठी आंदोलन सुरू झालेत तेव्हापासूनच किशोर तराळे हे आंदोलनात सहभागी होते.प्रामुख्याने आंदोलनात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे राज्य शासनाने बंद केले होते अशी महिती मिळाली.आज दि.7 जानेवारी असून या तारखेला सर्व कर्मचाऱ्याचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा होत असतात.आपल्या खात्यावर वेतन जमा झाले असेल या विश्वासाने ते आंदोलनाच्या ठिकाणावरून 500 मिटर अंतरावर असणाऱ्या एच.डी.एफ.सी.बँक च्या ATM मध्ये वेतन काढण्यास गेले असता त्यांना त्यांच्या खात्यात वेतन जमा झाल्या नसल्याची खात्री झाली.हे पाहताच क्षणी त्यांना ATM मध्ये हृदय विकाराचा जोरदार झटका आला.व त्याठिकानीच त्यांचा मृत्यू झाला असे काहींचे मत आहे.ही बाब काही व्यक्तीच्या लक्षात येता त्यांनी तात्काळ त्यांना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेने एस.टी. कर्मचारी पेटून उठले आहेत.सर्वांच्या मनात तीव्र नाराजी दिसून येत आहे.ही सरकार अजून किती लोकांची बळी घेणार असे प्रश्न उपस्थित व्यक्तींनी केला आहे..किशोर तराळे यांना त्यांच्या पश्चात पत्नी,2 मुले आणि 1 मुलगी असल्याचे समजते.
Maharashtra News Media सच की आवाज