Breaking News

*कन्हान ला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करुन पत्रकार दिवस थाटात साजरा केला* *भाजपा व ग्रामोन्नती प्रतिष्ठान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करुन पत्रकार दिवस थाटात साजरा केला*

*भाजपा व ग्रामोन्नती प्रतिष्ठान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ला भाजपा व ग्रामोन्नती प्रतिष्ठान द्वारे बाळशास्त्री जांभेकर यांची २१० वी जयंती साजरी करुन पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला .

*भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर*

कन्हान तारसा रोड येथील भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे यांच्या बंगल्या च्या आवारात भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले . आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना दुपट्टा, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी तर आभार शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी मानले. याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक, सचिन वासनिक, अमोल साकोरे, शैलेश शेळके, रिंकेश चवरे, सौरभ पोटभरे, तुलेषा नानवटकर, स्वाती पाठक, सुनंदा दिवटे, मीना कळंबे सह भाजपा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी*

स्वामी विवेकानंद ट्रस्ट प्रणित ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विन्रम अभिवादन करून २१० वी जयंती निमित्य पत्रकार दिवसी स्थानिय पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला.


माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी जेष्ट पत्रकार अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, सामाजिक कार्यकर्ता भरत सावळे यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून अना थाची माई थोर समाज सुधारक सिंधुताई सपकाळ हयाना दोन मिनीट मौन धारण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात कऱण्यात आली. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याविषयी प्रास्थाविक किशोर बासाडे, अजय त्रिवेदी, भरत साळवे हयानी मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकार अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, निलेश रावेकर , नितीन रावेकर, कमलसिंह यादव, शांताराम जळते, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, ऋृषभ बाववकर, किशोर वासाडे, धनंजय कापसीकर रोहीत मानवटकर, निलेश गाढवे, मोतीराम रहाटे आदींना शाल, प्लानर डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मा प्रकाश भाऊ जाधव हयानी अध्यक्षिय मार्गदर्शन करून उपस्थिताना नववर्ष आणि पत्रकार दिवसा च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचान ग्रामोन्नती चे कमलेश पांजरे हयानी केले तर आभार प्रविण गोडे हयानी व्यकत केले. कार्यर्कमाच्या यशस्विते करिता प्रतिक जाधव, सचिन साळवी, रूपेश गिरी, निशांत जाधव ह्यानी परिश्रम घेतले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …