*जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती व शिक्षक मित्र परिवार जिल्हा वर्धा चे वतीने स्व. सिंधुताई सपकाळ (माई) यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
वर्धा प्रतिनिधी – सुरेशकुमार बरे
वर्धा- महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती, वर्धा जिल्हा शिक्षण समन्वय समिती व शिक्षक मित्र परिवार जिल्हा वर्धा चे वतीने अनाथांची माय, आपल्या सर्वांच्या माई स्व. सिंधुताई सपकाळ यांना आज शनिवार दि. 08 जानेवारी 2022 ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष म्हणून खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू शेंडे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंगजी भालशंकर व मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सतिश जगताप उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी माईंच्या कार्यावर व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.माईंन सारख व्यक्तीमत्व व त्यांच्यासारखं कार्य पुन्हा होणे नाही व माईंनी आपल्या अनाथ मुलांच्या कार्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा असे मत जूनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे व जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मंगेश भोमले यांनी व्यक्त केले.

माईंन सारख कार्य तर आपण करू शकणार नाही परंतु त्यांच्या कार्याचा खारीचा वाटा जरी आपण सर्वांनी उचलून त्यांचे कार्य अविरत सुरू ठेवले तर हीच माईंसाठी खरी श्रद्धांजली ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय सहकार्यवाह मा.अजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष प्रविन भोयर व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री लोमेशजी वऱ्हाडे यांनी व्यक्त केले. शेवटी दोन मिनिटे मौन पाळून माईंना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी या श्रद्धांजली सभेला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे कार्यवाह महेंद्र सालंकार, खाजगी प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सुरेशकुमार बरे, प्रदीप गोमासे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सुरेश रोठे,दीपक ढगे, प्रदीप झलके, अनिकेत कावळे, जूनी पेन्शन संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद खोडे, उपाध्यक्ष प्रा. मंगेश भोमले, वर्धा तालुकाध्यक्ष प्रा. रितेश निमसडे, महिला आघाडी प्रमुख अश्विनी वानखेडे, अश्विनी इंगोले, मेरी साळवे, वैशाली लिडबे, वसुधा वनकर, अरुणा जक्कनवार, संगिता खोडे, आरोही खोडे, श्री सुनील ढाले, सुनील कोल्हे, श्री अरुण झोटींग, वैभव सोनकुसरे, प्रवीण पेटकर, मनोज डेकाटे, अमोल फाले, महेश वेखंडे तसेच समन्वय समितीमधील सहभागी सर्व संघटनांचे सर्व जिल्हा, तालुका, शहर पदाधिकारी, सदस्य , कार्यकर्ते व सर्व पेन्शन फायटर मोठया संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली सभेचे सूत्र संचालन प्रमोद खोडे यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज