*कन्हान ला कोरोना चा विस्फोट*
*आज ०९ कोरोना रूग्ण आढळले*
*तिसऱ्या लाट ९ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसराची एकुण २४ रूग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ११२ तपासणी अहवालात कन्हान परिसरातील ९ रूग्ण आढळल्याने नागरिकांनी कोरोनास हलक्यात न घेता शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक झाले आहे .
कोरोना च्या तिसऱ्या लाटेची शक्यता भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे कोरोना रूग्ण तपासणी करित असल्याने शनिवार दिनांक.८ जानेवारी २०२२ ला तीन ठिकाणी ११२ लोकांची तपासणी करण्यात आली. सोमवार दिनांक.१० जानेवारी ला आलेल्या तपासणी अहवालात कन्हान शहर व परिसरातील ०९ रूग्ण पॉझीटिव्ह आले आहे. यात कन्हान – ५, टेकाडी (कोयला खदान) – ३ व अननौन १ असे ९ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह आले आहे. दिनांक.१ डिसेंबर २०२१ ला टेकाडी (कोयला.खदान) नविन वसाहत येथील कोलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिसऱ्या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. शनिवार दिनांक.८ जानेवारी २०२२ पर्यंत १३ रूग्णांना कोरोना लागण झाली. सोमवार दिनांक.१० जानेवारी ला ९ रुग्ण आढळुन आले आहे . आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत २०, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे २ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण २४ रूग्ण संख्या झाली आहे . सध्या ९ रूग्ण होम कोरंटाईन करण्यात आले आहे.