*भाजपा युवा मोर्चा च्या पदाधिकार्यांनी मुख्यमंत्रीना पाठविले पत्र*
*विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरीत मागे घेण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र राज्याचा महाविकास आघाडी सरकार ने हिवाळी अधिवेशना च्या शेवट च्या दिवशी विधानसभेत गोंधळ घालून राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर मंजुर केल्याने कन्हान परिसरातील संतापलेल्या भाजपा युवा मोर्चा च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोस्ट आॅफीस समोर राज्य शासनाच्या विरोधात निर्दशने करुन डाक घर पेटी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने पत्र पाठवुन विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरीत मागे घेण्याची मागणी केली.
राज्यात नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातील शेवट च्या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारने गोंधळ करुन राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजुर केले.
रविवार दिनांक.९ जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ब्रांदा येथुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवुन अभियानाची सुरवात केल्याने कन्हान, कांद्री व टेकाडी येथील संतापलेल्या भाजपा युवा मोर्चा च्या पदाधिकार्यांनी भाजपायुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश रहाठे, जिल्हा अध्यक्ष आदर्श पटले, जिल्हा महामंत्री राहुल किरपान यांच्या नेतृत्वात कन्हान पोस्ट आॅफीस समोर राज्य शासनाच्या विरोधात निर्दशने करुन डाक घर पेटी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचे पत्र टाकुन व त्यांना पाठवुन विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी भाजपा पारशिवणी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र बुधे, ओबीसी मोर्चा आघाडी जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे, भाजपा कन्हान शहर अध्यक्ष मनोहर पाठक, महामंत्री सुनिल लाडेकर, भाजयुमो पारशिवणी तालुका अध्यक्ष प्रतिक वैद्य,भाजयुमो पारशिवणी तालुका महामंत्री सौरभ पोटभरे, सतीश वाडीभस्मे, मनोज गिरी, आशिष बुरसे , भाजयुमो पारशिवणी तालुका उपाध्यक्ष चक्रधर आकरे , संकेत चकोले , पंकज बारई , पारस यादव , भाजयुमो कांन्द्री अध्यक्ष लोकेश अंबाडकर विक्की सोलंकी , नितीन नागपुरे , सचिन कामडे , ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साखोरे,आकाश वाडणकर, शैलेश शेळकी , लावण्य पोटभरे, मारुती बावणे, प्रियांशु कामडे सह आदी भाजपायुमो चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज