*कलावंत व सोशल मीडिया प्रतिनिधी शैलेश ढोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग च्या नागपुर जिल्हा ग्रामिण कार्याध्यक्ष पदी नियुक्ति*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
नागपुर – गेल्या १५ वर्षा पासून कलावंत क्षेत्रात उत्कृष्ट अभिनय करनारे खापरखेडातील कलावंत शैलेश चंद्रभान ढोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष व विदर्भ समन्वयक गणेश लिमजे यांनी नागपूर जिल्हा ग्रामिण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे मुख्य कार्यालय देवडिया भवन येथे शैलेश ढोरे याना गणेश लिमजे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी प्रामुख्याने नागपूर जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष गिनीज बुक ऑफ वर्ल्ड गायक राजेश बुरबुडे उपस्थित होते.
नागपुर जिल्ह्यातील ग्रामिण भागात उत्कृष्ठ कलावंत आहेत हे त्यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे मात्र त्यांना संधी मिळत नाही त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त नागपूर जिल्हा ग्रामिण कार्याध्यक्ष शैलेश ढोरे यांनी सांगितले शिवाय कलावंत क्षेत्रात कार्यरत सर्व कलावंताची तालुका निहाय नोंदणी करुण वयाच्या ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग नागपूर जिल्हा ग्रामिण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्यामूळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार प्रदेश अध्यक्षा विद्याताई कदम, प्रदेश उपाध्यक्ष गणेश लिमजे यांचे शैलेश ढोरे यांनी आभार मानले.
शैलेश ढोरे यांची नागपूर जिल्हा ग्रामिण कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यामूळे अमर जैन,किशोर ढिडुले दिवाकर घेर, सुनील जालंदर, कपिल,दिलिप गजभिये,श्रीकांत जालंधर वानखेडे, बंडूभाऊ चौरागडे, राजेश खंडारे, विनोद गोडबोले, वैभव काकडे,सुखदेव सोनेकर,नरेद्र खेडकर,ऊमेश खेडकर,कुनाल काकडे,विनोद राऊत,विष्णु निकाडे , यांनी अभिनंदन केले आहे.