Breaking News

*म्हाताऱ्या महिलेचा हत्याऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच वर्ष ६ महिन्याची शिक्षा व दंड* *नालीत कचरा टाकण्यास मनाई केल्यामुळे केली होती हत्या*

*म्हाताऱ्या महिलेचा हत्याऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली पाच वर्ष ६ महिन्याची शिक्षा व दंड*

*नालीत कचरा टाकण्यास मनाई केल्यामुळे केली होती हत्या*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान परिसरातील नांदगांव येथे एका आरोपी ने नालीत कचरा टाकण्यास मनाई केल्याने म्हाताऱ्या महिलेची हत्या करण्यात केली होती. या प्रकरणात न्यायालयाच्या विद्यमान एस बी अग्रवाल सत्र न्यायाधिश नागपुर यांनी हत्या करणाऱ्या आरोपी पृथ्वीराज चव्हाण ला पाच वर्ष, ६ महिने सश्रम कारावास व दंडा ची शिक्षा ठोठावली आहे.


दिनांक.११ एप्रिल २०१७ ला दुपारी १ वाजता दरम्यान रेखा राधेश्याम पुरे वय ३८ वर्ष राहणार. नांदगांव एंसबा यांची सासु मृतक नर्मदाबाई शामराव पुरे वय ७० वर्ष राहणार. नांदगांव हि आपल्या घरा समोर उभी असतांना पृथ्वीराज देवचंद चव्हाण वय २३ वर्ष राहणार. नांदगाव याने तिचे जवळ येवुन तु मला ग्राम पंचायत च्या नालीत कचरा टाकण्यास का मनाई करते असे म्हणुन तिला हात बुक्कीने व फावड्याने मारून गंभीर जख्मी केले होते. कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून म्हताऱ्या महिलेला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात भर्ती केले. आणि फिर्यादी रेखा राधेश्याम पुरे याच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. उपचारा दरम्यान म्हातारी महिला नर्मदाबाई शामराव पुरे यांचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करून दिनांक.२१ एप्रिल २०१७ ला दुपारी ११.५२ वाजता आरोपीस अटक केली होती. सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही एम पोटे पोस्टे कन्हान यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरिता न्यायालयात सादर केले होते. सोमवार दिनांक. १० जानेवारी २०२२ ला न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिश एस बी अग्रवाल सत्र न्यायाधिश नागपुर यांनी म्हाताऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपी ला कलम ३०४ भादंवि मध्ये ५ वर्ष सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास, कलम ५०६ भांदवि मध्ये सहा महिने सश्रम कारावास १००० रूपयाचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारवासची शिक्षा अशी ठोठावली आहे. सरकार चे वतीने एपीपी जी एन दुबे यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामात पैरवी अधिकारी म्हणुन महिला सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी वाजे तर कर्मचारी सहा फौज शंकरराव तराळे, सुनिल डोंगरे, पोलीस हवालदार. मनोज तिवारी, महिला पोलीस शिपाई मृणाली चाके यांनी मदत केली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …