Breaking News

*श्रमदानातून करण्यात आली स्मशानभूमीची साफसफाई* *रामटेक आदिवासी भागातील सालई हिवरा येथील अभिनव उपक्रम*

*श्रमदानातून करण्यात आली स्मशानभूमीची साफसफाई*


*रामटेक आदिवासी भागातील सालई हिवरा येथील अभिनव उपक्रम*

रामटेक प्रतिनिधी -पंकज चौधरी
रामटेक – वरून अवघ्या 15 ते 20 कि.मी अंतरावर असलेल्या हिवरा सालई येथे ग्रामपंचायत मार्फत लोकांना मार्गदर्शन करून श्रमदानातून गावातील स्मशानभूमीची साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी,गावातील स्वयंसेवक,सामाजिक कार्यकर्ते,तरुण वर्ग,गावातील महिला बचत गट तसेच गावातील बऱ्याच व्यक्तींनी या श्रमदानाला महत्व देत स्मशानभूमीची साफसफाई केली.

 

या गावाचा आदर्श घेत तालुक्यातील तसेच सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांनी अशा स्वरूपाचे श्रमदान करून गावाची साफसफाई करून गाव आरोग्याच्या दृष्टीने सुलभ करावे.असे पदाधिकाऱ्यांनी मांडलेले मत आहेत.या कार्याला प्रामुख्याने सुधीर चौधरी व सौ.श्वेता सुधीर चौधरी यांनी अधिक मेहनत घेत कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडले.व स्वतःच्या श्रमदानाने साफसफाई करणाऱ्या समस्त ग्रामवासीयांचे व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …