*कन्हान येथे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा च्या विद्यार्थांना व विद्यार्थींनींना त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना बुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला .

बुधवार दिनांक १२ जानेवारी ला राजमाता जिजाऊ , युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद व क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोर असलेल्या ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे , प्रमुख अतिथि जेष्ठ पत्रकार कमल यादव , मराठा सेवा संघ कन्हान चे जेष्ठ कार्यकर्ता, प्रबोधनवादी चळवळीचे पुरसकर्ते, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा शांताराम जळते सर , मंच मार्गदर्शक भरत सावळे , व परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा चे मार्गदर्शक वस्ताद वखलकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मोतीराम रहाटे , शांताराम जळते व भरत सावळे यांनी राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद , सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित परमात्मा एक दांडपट्टा आखाडा निमखेडा चे सावी वखलकर (गोल्ड) , साक्षी सुर्यवंशी (गोल्ड) , अविनाश वखलकर (गोल्ड) , उरशी मलेवार (सिल्वर) , अल्केश वखलकर (सिल्वर) , छकुली बावणे (ब्रान्झ) , बुलबुल वखलकर (ब्रान्झ) , शितल वखलकर (ब्रान्झ) , राहुल वखलकर (ब्रान्झ) , आदित्य बावने(ब्रान्झ) या विद्यार्थांना व विद्यार्थींनींना त्यांचा उत्कृष्ट कामगिरी बद्दल मान्यवरांचा हस्ते त्यांना बुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन राष्ट्रीय युवा दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघा चे सचिव सुनिल सरोदे , जेष्ठ नागरिक प्रभारकर रुंघे , गौरव भोयर , केतन भिवगडे , अरविंद नाईक , प्रवीण हुड सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कन्हान शहर विकास संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , सदस्य हर्ष पाटील , किरण ठाकुर , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकार्यांनी सहकार्य केले .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे यांनी केले तर आभार मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांनी मानले .
Maharashtra News Media सच की आवाज