Breaking News

*येसंबा ग्रामपंचायत येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती थाटात साजरी*

*येसंबा ग्रामपंचायत येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती थाटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरातील येसंबा ग्रामपंचायत येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सरपंच धनराजजी हारोडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करुन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली . या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सदस्य वनिता ताई राऊत , अंगणवाडी सेविका मायाताई चकोले , आशावर्कर सुषमाताई गजभिये , अंगणवाडी मदतनिस कांताबाई गजभिये , विठ्ठलरावजी महाल्ले , भोजराजजी घरजाडे , गामाजी चकोले , इंद्रराजजी मेश्राम , पवनजी हारोडे , प्रमोदजी तांडेकर सह आदि गावकरी नागरिक व बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …