Breaking News

*खोडगाव येथे नागदिवाळी उत्सव साजरी*

*खोडगाव येथे नागदिवाळी उत्सव साजरी*

रामटेक प्रतिनिधि – पंकज चौधरी
रामटेक – आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचा पुढाकार.
रामटेक तालुक्यातील खोडगाव येथे आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना शाखा खोड़गाव च्या वतीने युवा दिनाचे औचित्य साधून नागदीवाळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या निमित्त कार्यक्रमस्थळी खनपूजा, मुठपुजा मांडण्यात आली होती. कु. लक्ष्मी रामदास पटले, कु. सपना गायकवाड, कु. प्रतिज्ञा खोब्रागडे, सपना सोनवाने, कु. प्रगती आडकने ह्यांच्या गुणवंत विद्यार्थी म्हणून दहावी व बारावी मध्ये उत्कृष्ट गूण मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गावातील नवनिर्वाचित सरपंच श्री. शिशुपालजी अतकरे यांचाही शाल श्रीफल व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रविन्द्र पाणतावणे यांचाही गावकऱ्यांनी भावपूर्ण सत्कार केला.याप्रसंगी विविध सांस्कृतिक कला व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी श्री. विलास नागोसे, शिवशंकर, गायकवाड, प्रवीण गायकवाड,युवराज डडमल, पालासर डडमल, सुभाष नागोसे, श्री. हैबत गायकवाड, श्री. धनराज ठाकरे व समस्त गावकरी व युवकानी सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …