*गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान , व ग्रामस्थाचे आरोग्यास धोका* *संबधित अधिकार्यांनी सात दिवसात योग्य कारवाई करा, अन्यथा कंपनी विरोधात शेतकर्यांचे आंदोलन – माजी खासदार प्रकाश जाधव*

*गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान , व ग्रामस्थाचे आरोग्यास धोका*

*संबधित अधिकार्यांनी सात दिवसात योग्य कारवाई करा, अन्यथा कंपनी विरोधात शेतकर्यांचे आंदोलन – माजी खासदार प्रकाश जाधव*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतकर्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आणि ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतकर्यांनी वारंवार निवेदन देऊन दखल न घेतल्याने स्थानिय माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयानी तहसीलदार प्रशांत सांगडे व संबधित अधिकारी यांना सांगितले की, कोल वाशरी व परिसरातील शेती आणि गावाची पाहणी, चौकशी करून कंपनी विरोधात योग्य ती कारवाई सात दिवसात करा, अन्यथा ही समस्या शेतकर्यांच्या जिवन मरण्याची असल्याने शेतकर्यांचे आंदोलन करून कंपनी बंद करू अशा इशारा दिला.
गट ग्राम पंचायत घाटरोहणा (एंसबा) व गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) शिवार लगत येसंबा जवळ गुप्ता कोल वाशरी महामिनरल प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी याच वर्षी सुरू होऊन रोज चार, पाचशे ट्रक कोळसा येणे-जाणे सुरु आहे. खदानचा कोळशा आणुन उघडयावर टाकुन पोकलँड व जेसीबी मशीनने कोळशा बारीक करून प्रकिया करित ट्रक मध्ये भरून बाहेर पाठविला जातो. कोल वासरीची कोळशा धुळ उडुन वराडा, वाघोली, एंसबा, नांदगाव व गोंडेगाव परिसरातील १०० हेक्टर वर असलेल्या शेतातील मोसंबी, कापुस, तुर, गहु, चना, मिरची, वांगे, गोबी सर्वच पिकाचे भंयकर नुकसान झाले आहे. कापुस काढण्यास शेतमजुर येत नाही. मोसंबी, मिरचे बाजारात विकायला नेल्यास कोणी घ्यायला तयार नाही. शेतपिकाचे अतोनात नुकासान शेतकर्याला भोगावे लागत आहे. दिवसभर शेतात काम करताना उडणार्या धुळीने शरीर, कपडे काळे झाल्याने गावात जायची सुध्दा लाज वाटते. कंपनीतुन कोळसाच्या उडणार्या धुळीमुळे जमिन, विहीर, नाल्या चे पाणी प्रदुषित होऊन गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नाले, विहीरीचे प्रदुषित पाणी नागरिक, जनावरे पित असल्याने शेतकरी, गावकर्यांचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे . यास्तव शेतकर्यांच्या व गावकर्याच्या जिवाशी खेळ होऊ नये म्हणुन गुप्ता कोल वासरी कंपनीच्या कोळशा धुळीमुळे झालेले शेतपिकाचे नुकसान शेतकर्यांना त्वरित कंपनी मालकाने दयावे. तसेच गावापासुन दुर दुसरी कडे जिथे कुणाचे नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी स्थानातरित करण्यात यावी. अश्या न्यायीक मागणीचे निवेदन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांच्या नेतुत्वात प्रशांत सांगाडे, तहसिलदार पारशिवनी, महाराष्ट्र प्रदुर्शन नियंत्रण मंडळ अधिकारी वाघ, मंडळ कृषी अधिकारी हयाना देऊन शेतकर्यांच्या समस्येवर गांभिर्याने लक्ष केंद्रीत करून गुप्ता कोल वाशरी कोळशा धुळी च्या प्रदुर्शनाची तपासणी व परिसराची पाहणी करून शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई कंपनी कडुन मिळवुन द्यावी. कोळसा धुळी पासुन मुक्त करण्यास सात दिवसात कार्यवाही करून योग्य न्याय द्यावा. अन्यथा समस्त शेतकरी, गावकरी कंपनी विरोधात जन आंदोलन करून कंपनी बंद करतील. त्यावेळेस उदभवणार्या प्रकारास कंपनी मालक व संबधित प्रशासन अधिकारी जवाबदार राहतील. अशा ईशारा देण्यात आला.


या प्रसंगी रामटेक क्षेत्राचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, कमलसिह यादव, गोंडेगाव सरपंच नितेश राऊत, प्रक ल्पग्रस्त शेतकरी तेजराम खिळेकर, धनराज घोडमारे, दिलीप ठाकरे, कृष्णाजी खिळेकर, आंनदराव गुरांदे, मारोतराव लसुंते, हिरालाल खिळेकर, युवराज नाकतोडे, राजु बोबडे, सुधाकर खिळेकर, धनराज पांडे, संदीप ठाकरे, अतुल चरडे, राजेश खिळेकर सह आदी शेतकरी व गावकरी प्रामुख्याने मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …