Breaking News

*किरंगीसर्रा (कोलितमारा) गावात आदिवासी लोकांना कंबल व तिळ गुड वाटप करुन मकर संक्रांत थाटात संपन्न* *समर्पण सेवा समिति चे जनहितार्थ उपक्रम*

*किरंगीसर्रा (कोलितमारा) गावात आदिवासी लोकांना कंबल व तिळ गुड वाटप करुन मकर संक्रांत थाटात संपन्न*

*समर्पण सेवा समिति चे जनहितार्थ उपक्रम*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील किरंगीसर्रा (कोलितमारा) गावात आदिवासी क्षेत्रात समर्पण सेवा समिति चे अध्यक्ष गिरीश व्यास यांच्या मार्गदर्शनात पदाधिकार्यांनी आदिवासी लोकांना कंबल व तिळ गुड वाटप करुन मकर संक्रांत उत्सव थाटात संपन्न करण्यात आला .


किरंगीसर्रा (कोलितमारा) हे गाव पेच च्या जंगलात बसलेला आदिवासी गाव असुन या गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचा नेटवर्क नसुन पांधन रस्ते खराब झाल्याने लांब दुरी किलोमीटर पर्यंत जाणे येणे करावे लागत असुन गावात विविध समस्या निर्माण झाले आहे .


अश्या या विषम परिस्थिति मध्ये समर्पण सेवा समिति च्या पदाधिकार्यांनी नागपुर येथुन किरंगीसर्रा (कोलितमारा) गावात जाऊन येथील राहणाऱ्या ७५ परिवारांना कंबल , तिळ गुड , नमकीन , मिठाई , व गर्भवती महिलांना देसी गाय का घी , पायातील मोझे , लहान मुलांन करिता बिस्कीट , चाॅकलेट , फळ व घरघुती सामग्री वाटप करुन मकर संक्रांत उत्सव थाटात संपन्न करण्यात आला .


या प्रसंगी नागपुर चे नगरसेवक हितेश जोशी , नागपुर चे व्यापारी मंडल समाज़सेवक , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , युवा मोर्चा तालुका महामंत्री मनोज गिरी, सौरव पोटभरे, तालुका मंत्री संजय चोपकर, मारोतीजी व गावातील ग्रामपंचायत सदस्य ,आशा वर्कर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …