*जुन्या मजुरी च्या पैशाच्या कारणा वरुन तीन आरोपींनी फिर्यादी ला लाखडी दांड्याने व चाकु सारऱ्या वस्तुने मारुण केली गंभीर दुखापत*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग वर ६ किलो मीटर अंतरावर असलेल्या मौजा वराडा येथे एम एच के एस पेट्रोल पंप जवळ जुन्या मजुरी च्या पैशाच्या कारणा वरुन तीन आरोपींनी संगमत करुन फिर्यादीला लाखडी दांड्याने व चाकु सारख्या वस्तुने मारुण गंभीर दुखापत केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता च्या दरम्यान आरोपी १) शालु पाजी २) विशाल ३) अमित तीघ ही राहणार सुखदेव काॅलोनी , कांद्री कन्हान यांनी संगमत करुन फिर्यादी विरेन्द्र श्रीराम जैस्वार यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन जुन्या मजुरी च्या पैशाच्या कारणा वरुन अश्लील शिवीगाळ करुन लाखडी दांड्याने व चाकु सारख्या वस्तुने फिर्यादी विरेन्द्र श्रीराम जैस्वार यांच्या उजव्या हातावर , डाव्या पायावर , पाठीवर , मानेवर व कानावर मारुन गंभीर दुखापत केली असुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी विरेन्द्र श्रीराम जैस्वार यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन आरोपी विरुद्ध कलम ३२४ , २९४ , ४२७ , ५०६ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाल हे करीत आहे .

Maharashtra News Media सच की आवाज