*ब्रेकिंग न्यूज*
*कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथील डॉक्टर सह ४७ व साटक ०२ असे एकुण कन्हान परिसरात ४९ कोरोना रुग्ण आढळले*
*प्राथ. आ. केंद्र कन्हान डॉक्टर १, कर्मचारी ३, वराडा सीएचओ १ कोरोना संक्रमित*
*तिसऱ्या लाटेची चाहुल ७१ कोरोना रूग्ण होम कोरंटाईन असुन कन्हान परिसर एकुण १४५ रुग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कोरोना तिसरी लाट सुरू होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ७४ तपासणीत कन्हान प्राथमिक.आरोग्य.केंद्र येथील डॉक्टर १, कर्मचारी ३, वराडा सीएचओ १ असे एकुण ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असुन आता पर्यंत १४५ रूग्ण संख्या झाली असुन ७४ बरे झाले. सध्या ७० रूग्णांना होम क्वोरंटाईन करून एका रूग्णाचा नागपुर येथे उपचार सुरू आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार दिनांक.१७ जानेवारी च्या आलेल्या ७४ तपासणी ४७ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३६ तपासणीत ०२ असे एकुण ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळुन आले असुन एकुण ७० रूग्णांना घरीच उपचार करण्यात येत असुन एका ला नागपुर येथे उपचार सुरू असुन कन्हान परिसरात एकुण १४५ रूग्ण संख्या झाली आहे.
दिनांक.१ डिसेंबर २०२१ ला टेकाडी (को.ख) नविन वसाहत येथील कोलकत्ता वरून आलेल्या तरूणाची प्रकृती बिघडल्याने नागपुर ला खाजगी रूग्णालयात दाखल केल्याने खाजगी तपासणीत तिसऱ्या लाटेचा पहिला रूग्ण आढळुन आला. सोमवार दिनांक.१७ जानेवारी २०२२ पर्यंत ६६ कोरोना रूग्ण संक्रमित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान सोमवार च्या ७४ तपासणीत मंगळवार दिनांक.१८ जानेवारी ला येऊन कन्हान केंद्रातुन ४७ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या ३६ तपासणीत ०२ असे कन्हान परिसर एकुण ४९ संक्रमित रुग्ण आढळले आहे. यात स्वामी विवेकानंद नगर कन्हान ५, हनुमान नगर ४, अशोक नगर ३, शिवनगर ३,पटेल नगर पिपरी ३, पिपरी ३, गणेश नगर २, इंदिरा नगर २, सत्रापुर २, सुरेश नगर १, आनंद नगर १, वाघधरे वाडी १, सिहोरा १ असे कन्हान नगरपरिषद क्षेत्र एकुण ३१ व कांद्री ६, संताजी नगर कांद्री ४, खदान २, टेकाडी (कोख) १, गोंडेगाव १, खंडाळा १ नागपुर १ असे कन्हान परिसर एकुण ४७ आणि वराडा सीएचओ १, तेलनखेडी १ असे कन्हान परिसर एकुण ४९ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले असुन आता पर्यंत खाजगी तपासणीत २, प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या तपासणीत १३२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक चे १०, कामठी – १ रूग्ण असे कन्हान परिसरात एकुण १४५ रूग्ण संख्या झाली असुन सध्या ७४ रूग्ण दुरूस्त झाले तर ७० रूग्ण होम कोरंटाईन करून एकाचा नागपुर येथे उपचार सुरू आहे .