*आज पासुन कन्हान येथील दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद* *नियमांचे व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई* *नगर परिषद प्रशासनाचे दुकानदारांना व नागरिकांना आव्हान*

*आज पासुन कन्हान येथील दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद*

*नियमांचे व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई*

*नगर परिषद प्रशासनाचे दुकानदारांना व नागरिकांना आव्हान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहरात व परिसरात पुन्हा एकदा कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने दिवसेन दिवस वाढत असल्याने जिल्हाधिकार्यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने शहरातील बाजारात दवंडी फिरवुन दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार आज पासुन बंद करण्याचे आव्हाहन केले आहे अन्यथा नियमांचे व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .


देशात , राज्यात , जिल्ह्यात , तालुक्यात , शहरात व परिसरात पुन्हा एकदा कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने दिवसेन दिवस वाढत असुन शासनाने नवीन नियमावली लागु केली असुन कडक नियम व निर्बंध लावण्यात आले आहे . सध्या कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक शहरात भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश लागू केल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासना ने मागील शुक्रवार दिनांक १४ जानेवारी ला शहरातील बाजार पेठेत दंवडी फिरवुन भाजीपाला सह इतर दुकानदारांना आज पासुन पुढील आदेश पर्यंत दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याचे आव्हाहन केले आहे अन्यथा नियमांचे व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …