*सावनेर मध्ये कोविड़ 19 नियमांचे पालन न करणाऱ्या हाँटेल संचालकांवर कारवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः कोविड़ 19 रोगाच्या अनुशंगाने राज्य सरकारने काही निर्बंध जारी कले असुन त्या बाबत मा. जिल्हादंडाधिकारी नागपुर यांनी नागपुर जिल्हयात कोविड़ 19 च्या अनुशंगाने आदेश लागु केले आहेत. त्या आदेशाने उल्लघंन करणा-या हॉटेल चालक व दुकानदार यांच्यावर कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक सो नागपुर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक सो नागपुर ग्रामीण व उपविभागीय अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे सावनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 19/01/2022 रोजी कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन करणारे खालील हॉटेल चालक व दुकानदार यांच्यावर भादवि कलम 188.269 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1)सदर कारवाईत आकाश पान पॅलेस पाटनसांवगी शिवार चे मालक समीर रामेश्वर यादव वय 33 वर्ष र सदभावना नगर पाटणसांवगी ता. सावनेर.
2) चहा दुकान टोलनाकाजवळ पाटणसांवगी शिवार येथील प्रतिक सतिष बागडे वय 21 वर्ष रा पहलेपार सावनेर.
3)चाय सुट्टा पानठेला व चहाचे दुकानदार आकाश मोहनलाल ठाकुर वय 23 वर्ष रा.सदभावना नगर पाटणसांवगी ता. सावनेर.
4) कु्णाल हॉटेल अँन्ड रेस्टारंन्ट ढाबा सावनेर मालक कुणाल मधुकर घोडे वय – 26 वर्ष रा सावनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले.
*सदरची कारवाई पोलीस निरीक्षक मारूती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक फुलेकर, सहा पोलीस निरीक्षक सतिष पाटील, पोहेकाँ सुभाष रुडे ,संदिप नागरे,पो.ना खोमेश्वर बांबल, हेमराज कोल्हे ,विशाल इंगोले यांनी केली असुन मारूती मुळूक पोलीस निरीक्षक सावनेर पोलीस स्टेशन यांनी सावनेर पोलीस हद्दीतील हाँटेल,रेस्टॉरंट,ढाबे संचालक तसेच दुकानदारांना आपन व्यवसाय करतांना शासनाने ठरवून दिलेल्या कोविड़ 19 च्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन करुणच व्यवसाय करावा अन्यथा कारवाईस पुढे जावे लागेल असे निवेदन केले आहे*