Breaking News

*थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन* *गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,तसेच गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग* *अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली*

*थोर नाटकार,साहित्यिक.भाषाप्रभू कै.राम गणेश गडकरी यांना 103 व्या पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन*

*गणेश वाचनालय,गडकरी युवा मंच,गडकरी स्मृती निलयम,राम गणेश गडकरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आदींचे पदाधिकारी,तसेच गडकरी प्रेमींचा उत्सुफुर्त सहभाग*

*अनेक मान्यवरांनी वाहली भावपूर्ण श्रध्दांजली*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेरः थोर नाटकार साहित्यिक, भाषाप्रभू व शेक्सपियर उपाधि ने नावाजलेले कै राम गणेश गडकरी यांचा वारसा जपनार्या सर्व संस्थांनी कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्ताने कोवीड़19 च्या वाढत्या संसर्गामुळे सकाळी 9-00 वाजता पासून त्यांचे निवास स्थान,समाधी स्थळ,पुतळा व गणेश वाचनालय येथे पोहचून कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस अभिवादन करित त्यांना भावपूर्ण श्रध्दांजलि वाहली.*


*कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथि निमित्त पुरातत्व विभाग नागपूर व्दारे गडकरी निवास स्थानाला सुंदर असे फुल माला व विद्यूत रोशनाई ने तर नगर पालिका सावनेर व्दारे समाधी स्थळ व पुतळ्याची आकर्षक सजावट केली होती हे विशेष…*

*कै.राम गणेश गडकरी यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्ताने सर्वप्रथम गणेश वाचनालय सावनेर येथे अँड् चंद्रशेखर बरेठीया,डॉ.विजय धोटे,समाजसेवी गोपाल घटे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करुण तर गडकरी पुतळा व समाधी स्थळ,तसेच निवासस्थानी पोहचून कै.राम गणेश गडकरी युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष किशोर ढुंढेले,सचिव प्रथमेश देशपांडे,मुकेश झरबडे,राम गणेश गडकरी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष युवराज टेकाडे,सचिव प्रा.विजय टेकाडे व शिक्षक वु्ंद, गडकरी स्मृती निलयम चे श्याम धोटे,राजेश पेंढारी सह अनेक गडकरी प्रेमींनी थोर साहित्यिक,नाटककार कै राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीला उजाळा दीला*

 

*कै.राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य शोभा ताजणे, प्रा. बोरीकर सर,प्रा.बावणे सर, प्रा.घुगल सर,प्रा.निखाडे सर, प्रा.गायकवाड मॅडम,प्रा. ठाकरे मॅडम,प्रा.देशमुख मॅडम, प्रा.उमाटे मॅडम, प्रा. धांडोळे मॅडम, प्रा.भोंग मॅडम,प्रा. मोवाडे मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*याप्रसंगी नगर परिषद सावनेर व्दारे पुतळा व समाधी स्थाळाला तसेच पुरातत्व विभाग नागपुर व्दारे निवास स्थानाला पुष्षमालां व विध्युत रोशनाईने आकर्षक रित्या सजवीण्यात आले*


*याप्रसंगी शंकर ढोके,अँड् पुरे,सुधाकर दहिकर,रघुनंदन जामदार,संजय बन आदीसह शेकडो गडकरी प्रेमी उपस्थित होते*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …