*कन्हान ला बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती थाटात साजरी*
*सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे व येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरात हिंदुहद्यसम्राट स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
सर्वधर्म समभाव संघटन कन्हान
कन्हान येथे सर्वधर्म समभाव संघटन द्वारे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संघटनेचे अध्यक्ष चंदन मेश्राम यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित कन्हान – कांद्री दुकानदार महासंघा चे अध्यक्ष अकरम कुरैशी यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व संघटने च्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी शैलेश सहारे , सचिन मेश्राम , अभय ठाकुर , आशिष मेश्राम , कवडु पडोती , रितेश ठाकुर , अक्षय फुले , शुभम मंदुरकर , अविनाश हातागडे सह आदि नागरिक उपस्थित होते .

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय कन्हान
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय कन्हान येथे हिंदुहद्यसम्राट स्वर्ग श्री बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांनी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले असुन कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य , व कर्मचाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी येसंबा ग्रामपंचायत सदस्य पंकेश्वर चकोले , सदस्या वनिता ताई राऊत , मायाताई चकोले , अंगणवाडी सेविका हिराताई चकोले , आय.सी.आर.पी , सुषमाताई गजभिये , आशावर्कर , कांताताई गजभिये , अंगणवाडी मदतनिस विठ्ठलराव महाल्ले , भोजराजजी घरजाळे , कुमारी गडे , संजय गजभिये सह आदि ग्रामपंचायत कर्मचारी आणि बालगोपाल प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज