*शेताच्या रस्त्यावरून वयोवृद्ध भावाला काठीने मारहाण* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला घरजाडे यांच्या वर गुन्हा दाखल*

*शेताच्या रस्त्यावरून वयोवृद्ध भावाला काठीने मारहाण*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला घरजाडे यांच्या वर गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि ‌- ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस सात किलो मीटर अंतरावर असलेल्या खेडी गाव शेत शिवारात शेताच्या धुऱ्याच्या कारणावरून वयोवृद्ध व्यक्तीला काठीने मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे.


प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.२१) रोजी साडे पाच वाजता दरम्यान घनश्याम आंनद घरजाडे वय ७० वर्ष राहणार. खेडी-कन्हान हे शेतातील काम आटोपुन घरी परत येत असतांना घरजाडे यांचे भाऊ नेमदेव घरजाडे यांनी थांबवुन म्हटले की, तु माझ्या शेताच्या धुऱ्या वरून का येणे-जाणे करतो ? दोघांचा शेतीचा रस्त्यावरून शाब्दिक वादविवाद होऊन घरजाडे यांनी घनश्याम घरजाडे यांचा दोन्ही हाताला लाकडी काठीने मारहाण करून गंभीर जख्मी केले. कन्हान पोलीसानी घरजाडे यांचा तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय अभिप्राय वरून आरोपी नेमदेव घरजाडे विरूध्द कलम ३२४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस हवालदार नरेश वरखडे करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …