*वेकोलि सुरक्षा रक्षकास शिविगाळ देऊन केली मारहाण*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेकोलि कोळसा खदान क्रमांक ३ ब्लॅक डायमंड स्टेडियम जवळ दोन आरोपींनी ट्रक चालका ला विनाकारण शिविगाळ करित असतांना वेकोलि सुरक्षा रक्षकाच्या गाड़ी वर लांकडी दंड्याने मारून गाडीचे बोणेट चेपकवुन तसेच सिल पटया जाळुन एकुण १०५०० रूपयाचे नुकसान करून शिविगाळ व मारहाण केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.२२ जानेवारी २०२२ चे सायंकाळी ६:३० वाजता दरम्यान खदान क्रमांक ३ ब्लॅक डायमंड स्टेडियम जवळ वेकोलि सुरक्षा रक्षक शुभम केसरीचंद खगारे वय २९ वर्ष राहणार. दुर्गा मंदिर जवळ पिपरी-कन्हान व खाजगी ड्राइवर सह वेकोलि खुली कोळसा खदान येथे पेट्रोलिंग कामी जात असतांना समिर सिद्धिकी व प्रमोद सिंग राहणार. खदान नंबर ४ हे तेथे आले व एम एच ४०/ वी आय ४९५३ क्रमांकाचा ट्रक चालकास विनाकारण शिविगाळ करू लागले. त्या दरम्यान शुभम केशरीचंद खगारे व चालक हे आपल्या गाडीतुन उतरून उभे झाले असता समिर सिद्धिकी याने शुभम खगारे यांच्या गाडीवर लाकडी दंड्याने मारून गाडीचे बोणेट चेपकवुन अंदाजे १०,००० रुपयाचे नुकसान केले. शुभम ने विचारले असता समिर सिद्धिकी ने शुभम खगारे यास अश्लील भाषेत शिविगाळ करून वर्दीचे काॅलर पकडुन काॅलर चे तीन बटन तोडले व हातबुक्याने मारहाण केली. तर प्रमोद सिंग याने शिवीगाळ करून ढकल ढुकल करित शासकीय कामात अडथळा केला आणि सील पाॅईंट येथील २०० सील पट्या जाळुन ५०० रुपयाचे नुकसान केले.सदर प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी शुभम खगारे यांच्या तोंडी तक्रारी वरून समिर सिद्धिकी व प्रमोद सिंग या दोन्ही आरोपी विरुद्ध कलम ३५३, ३३२, २९४, ५०६, ४२७, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.