Breaking News

*खेडी- येसंबा रस्त्याचे भुमिपुजन थाटात संपन्न* *१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन थाटात संपन्न*

*खेडी- येसंबा रस्त्याचे भुमिपुजन थाटात संपन्न*

*१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन थाटात संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम कैलास बरबटे यांच्या हस्ते थाटात पार पाडले.
शुक्रवार दिनांक.२१ ला जिल्हा परिषद सदस्य कैलास बरबटे यांच्या हस्ते व येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या प्रमुख उपस्थित खेडी ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी च्या बांधकामाचे भुमिपुजन थाटात संपन्न करण्यात आले. या प्रसंगी येसंबा ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे, उपसरपंच रविन्द्र बांगडे, सदस्य अश्विन डडुरे, पंकेश्वर चकोले, वासुदेव कारेमोरे, प्रेमदास मडावी, गणेश तांडेकर, हर्षद हारोडे, संजय गजभिये, राजु सहारे, सोहन नारनवरे सह नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …