*कन्हान शहरात व परिसरात ७३ वा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा*
*शहिदांना व महापुरूषांना दिली श्रद्धांजली*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना द्वारे ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून शासनाच्या कोविड-१९ च्या मार्गदर्शक नियमाचे पालन करित महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ध्वजारोहण करून सलामी व संविधान प्रास्ताविकाचे वाचन आणि राष्ट्रगीत गायन “प्रजासत्ताक दिन चिरायु हो” च्या जय घोषात कन्हान शहरात व परिसरात ७३ वा प्रजासत्ताक दिन थाटात साजरा करण्यात आला.

कन्हान-पिपरी नगर परिषद, कन्हान
कन्हान-पिपरी नगरपरिषद येथे ७३ वा प्रजासत्ताक दिवसा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उपस्थित सर्व सन्मानिय उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, नप अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व नागरिकांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन संविधान प्रास्ताविकेचे वाचन आणि राष्ट्रगीत गायन करून प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान-पिपरी नगरपरिषद उपाध्यक्ष डायनल शेंडे, माजी नप उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, अनिल ठाकरे, राजेश यादव, मनिष भिवगडे, विनय यादव, नगरसेविका कल्पना नितनवरे, गुंफाताई तिडके, मोनिका पौनिकर, रेखा टोहणे, संगीता खोब्रागडे, वर्षा लोंढे, वंदना कुरडकर, सुषमा चोपकर, पुष्पा कावडकर, नप अधिकारी संकेत तलेवार, सुशांत नरहरे, नामदेव माने, पंकज खडसे, मोहनसिंग यादव, दिनेश विश्वकर्मा, देवीलाल ठाकुर, लकेश माहतो, रविंद्र धोटे, विजय देशमुख सह मान्यवर आणि नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंन्द्र, कन्हान
प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करित ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन थाटात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करित कुष्ठरोग, तंबाकु मुक्ती ची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमास प्राथ. आ. केंद्राचे सर्व डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


आदर्श हायस्कुल व आयडिएल काॅन्हेंट कन्हान.
कन्हान परिसरातील आदर्श हायस्कुल व आयडिएल काॅ. कन्हान येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव भरत सावळे व सहसचिव निता मेश्राम यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करीत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदर्श हायस्कुल च्या मुख्याध्यापिका चंन्द्रकला मेश्राम, आयडिएल काॅ चे शिक्षक शिक्षिका उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज डोंगरे सर यांनी तर आभार गिरजाशंकर यादव सर यांनी मानले .


विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान
विवेकानंद सेवा मंडळ ट्रस्ट सलग्न ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे ७३ प्रजास्ताक दिना निमित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी बळीराम दखने हायस्कुल मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक राजाभाऊ रामव्दार, नथ्थुजी चरडे, पत्रकार चंद्रकुमार चौकसे, अकरम कुरेशी, भगवानदास यादव , विजय डोणेकर, राजुरकर जी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्वा विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र चकोले यांनी तर आभार कमलेश पांजरे हयानी व्यकत केले. कार्यक्रमा च्या यशस्विते करिता दिलीप राईकवार, मोतीराम रहाटे, गोविंद जुनघरे, अशोक हिंगणकर, चंद्रशेखर कळमदार, प्रविण गोडे, महेश काकडे, किशोर वासाडे, गौरव भोयर, सचिन साळवी, माधव काठोके, कमल सिंह यादव , सुनिल सरोदे , ॠषभ बावनकर , प्रशांत येलकर, प्रतिक जाधव , जिवन ठवकर, बंटी हेटे, आकाश पंडीतकर, कुणाल आगुटलेवार, राजु गणोरकर, निशांत जाधव आदीने सहकार्य केले.

हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे संचालक श्री नरेंद्र वाघमारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून ध्वजारोहण केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत चांदेवार यांनी तर प्रस्तावि क मुख्याध्यापक वंदना रामापुरे यांनी आणि आभार प्रदर्शन आयेशा अन्सारी यांनी केले. कार्यक्रमास समस्त शिक्षकवृंद लीला खुरगे, हेमंत वंजारी, कीर्ती वैरागडे, मंदाकिनी रंगारी, नेहा गाईधने, गीता वंजारी, रूपेंद्र सेंगर, हेमंत वाघमारे, गणेश रामापुरे उपस्थित होते.
यशवंत विद्यालय वराडा
यशवंत विद्यालय वराडा येथे ७३ वा प्रजासत्ता क दिवसी शाळेचे संचालक भुषणजी निंबाळकर यांचे हस्ते महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करित ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती निंबाळकर, शिक्षिका अर्चना शिंगणे, शिक्षक राजेद्र गभणे, राकेश गणवीर, सतिश कुथे, रोशन राउत, मोतीराम रहाटे, दिपक पांडे आदी च्या प्रमुख उपस्थित प्रजासत्ताक दिन थाटात साजरा करण्यात आला.

भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान संताजी नगर कांद्री कन्हान
भुमिपुत्र युवा प्रतिष्ठान द्वारे संताजी नगर येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मारकाची पुजा अर्चना करून ध्वजारोह ण श्री सुभाष नखाते यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अतुल हजारे, चंद्रशेखर बावनकुळे, अरूणा हजारे, अरुणा पोहरकर, सुरेंद्र चटप, नामदेव कुभंल कर, सुरेश गुरव, सुभाष नखाते, जगन शेंन्द्रे, श्याम सुंदर गुप्ता, उमेश लोनारे, झिंगरे काकाजी, निखिल हजारे, अप्पीजी सैनी, विककी कुम्भलकर, शुभम यादव, रोशन नखाते, वंदना गड़े, पुर्णिमा ठाकरे, प्रीति लंगड़े सह नागरिक बहु संख्येत उपस्थित होते.

सर्व धर्म समभाव संघटन कन्हान
सर्व धर्म समभाव संघटन कन्हान द्वारे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरैशी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी महा पुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभि वादन करून प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा कर ण्यात आला. याप्रसंगी सर्वधर्म समभाव संघटन कन्हान शहर अध्यक्ष चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, कन्हान पोलीस स्टेशन गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम, पुरुषोत्तम बावने, मंगेश मेश्राम, आर्यन मेश्राम, अभिषेक डाहाटे, विनोद मसार, अविनाश हातागडे, अनिल जी सह नागरिक उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्र साटक
विरोधी पक्ष उपगट नेता तसेच जिल्हा परिषद सदस्य वेंकटजी कारेमोरे यांच्या अध्यक्षेत साटक प्रा थमिक आरोग्य केंद्र साटक येथे ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी ग्रा पं साटक सरपंच सिमाताई उकुंडे, उपसरपंच गजानन वाढरे, भीमराव वाडीभस्मे, डॉ.प्रज्ञा आग्रे, डॉं. तिवारी, माजी सरपंच मनिरामजी वाडीभस्मे , गोविंद चोपकर, सतीश वाडीभस्मे, बीजेपी अनुसूचित जाति मोर्चा नागपुर जिल्हा ग्रामीण कोषाध्यक्ष श्री धर्मेन्द्र गणवीर, लीलाधर गुरूपंचाग, दीपक मोहनकर सह कर्मचारी, कार्यकर्त आणि नागरिक उपस्थित होते.

नेहा प्राथमिक शाळा कन्हान
नेहा प्राथमिक शाळा कन्हान च्या व्दारे शाळा संस्थापक अध्यक्ष श्री. प्रेमलाल रोडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७३ वा गणराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विकास पाटील, श्री प्रकाश बागडे, मुख्याध्यापक श्री गणेश खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी प्रथम संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंगला पाहुणे यांनी तर आभार वनिता घोडेस्वार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

कांद्री ग्रामपंचायत कार्यालय , कन्हान
कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले .

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे ७३ व्या प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करण्यात आले असुन जर्नाधन बागडे व अकरम कुरैशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
या प्रसंगी आनंद बेलसरे , पुरुषोत्तम कुंभलकर , ज्ञानेश्वर विघे , शफीक शेख , श्याम बाबु पिपलवा , श्रीराम नांदुरकर , मायाताई भोयर , योगीता भेलावी , तेजस्वी बेलसरे , पुष्पाताई नागपुरे , अभिषेक बेलसरे , देविदास तडस , आशिष नागपुरे , अमित बेलसरे , राम ठाकरे , सुरज प्रसाद , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .

कांन्द्री वॉर्ड नं 3 लहान हनुमान मंदिर
कांन्द्री वॉर्ड नंबर 3 लहान हनुमान मंदिर येथील पटांगणात गणतंत्र दिन साजरा करण्यात आला सौ.दुर्गाताई सरोदे सदस्या ग्रा.पं. कान्द्री यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . या प्रसंगी शिवाजी चकोले , पुसाराम देशमुख , मोतीराम ठाकरे , रवी झिंगरे , धनराज ढोबळे , कुसुम किरपान , आदी नागरिक उपस्थित होते .

येसंबा ग्रामपंचायत कार्यालय , कन्हान
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिन निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच श्री. धनराज हारोडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक शाळा येसंबा येथे सुध्दा ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य , अंगणवाडी सेविका ,आशावर्कर ,अंगणवाडी मदतनिस , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,आणि बालगोपाल मोठ्या संख्येत कार्यक्रमाला उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज