*खंडाळा (घटाटे) येथुन अज्ञात आरोपी ने मुलाला पळवुन नेले*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खंडाळा (घटाटे) शिवार येथुन कोणीतरी अज्ञात आरोपीने एका मुलाला पळवुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार दिनांक.१८ जानेवारी ला दुपारी २ ते ४ वाजता दरम्यान दिनेश बंसी मनघटे वय ४० वर्ष राहणार. खंडाळा (घटाटे) यांचा मुलगा घरी कोणालाही न सांगता निघुन गेला असुन त्याचा जवळ असलेला मोबाइल क्रमांक. ७५१७९२८६३३ व मो. क्रमांक ९५२९५७५६५५ वर फोन करून तसेच नातेवाईकां कडे व मित्रांकडे शोध घेतला असता मिळुन न आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी दिनेश बंशी मनगटे यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३६३ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.