*कन्हान परिसरात ३० कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद*
*कन्हान २२, साटक ०८ असे एकुण कन्हान परिसरात ३० कोरोना संक्रमित रुग्ण आढळले*
*तिसऱ्या लाटेची चाहुल ८९ कोरोना होम कोरंटाईन करून कन्हान परिसरात एकुण २९५ रुग्ण*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहराती व परिसरात कोरोनाची तिसरी लाट सुरु होत दिवसेन दिवस कोरोना रूग्ण वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या ५३ तपासणी कन्हान २२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ६३ तपासणीत ०८ असे कन्हान परिसरात एकुण ३० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले असुन आता पर्यंत २९५ रूग्ण संख्या झाली असुन २०५ बरे झाले तर एका रुग्णांचा मृत्यु झाला आहे . तर सध्या ८९ रूग्णाना होम क्वोरंटाईन करून घरीच उपचार सुरू आहे.
कन्हान शहरात व परिसरात कोरोना तिसऱ्या लाटेची सुरूवात भासत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे बुधवार दिनांक.२६ व शुक्रवार दिनांक.२८ जानेवारी च्या आलेल्या ५३ तपासणीत कन्हान २२ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या २६ तपासणीत ०८ यात डुमरी कला ४, केरडी १, साटक १, डुमरी स्टेशन १, निमखेडा १ असे ०८ रुग्ण मिळुन आल्याने कन्हान परिसरात एकुण ३० कोरोना संक्रमित रूग्ण आढळले. आता पर्यंत एकुण ८९ रूग्णाना घरीच उपचार करण्यात येत असुन कन्हान परिसरात एकुण २९५ रूग्ण संख्या झाली असुन २०५ रूग्ण दुरूस्त झाले. तर एकाचा मृत्यु झाला आहे.
Maharashtra News Media सच की आवाज