Breaking News

*समाजसेवी हितेश बंन्सोड यांचा नागरी सन्मान* *राजमाता जिजाऊ फाउंडेशन नागपूर तर्फे हितज्योति आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांना उत्कृष्ट समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले*

*समाजसेवी हितेश बंन्सोड यांचा नागरी सन्मान*

*राजमाता जिजाऊ फाउंडेशन नागपूर तर्फे हितज्योति आधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांना उत्कृष्ट समाजसेवक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – 29/1/22 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे आयोजित समारंभात समाजसेवी हितेश बंन्सोड यांच्या निरंतरतेने सुरु असलेल्या समाजकार्यची राजमाता जिजाऊ फांऊंडेशन च्या वतीने दखल घेत त्यांना शाल श्रीफल व स्मृतीचिन्ह प्रदान करुण सन्मानित करण्यात आले.


*याप्रसंगी प्रमुख अतिथी मध्य नागपूरचे मा. श्री विकास कुंभारे आमदार पूर्व नागपूर,आमदार श्री कृष्णाजी खोपडे डॉ.अशोक बागुल सायबर सेल पोलीस निरीक्षक,डॉ. गिरीश चरडे,राजमाता जिजाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष शरू हरीश निमजे आणि राजमाता जिजाऊ फाऊंडेशन चे समस्त पदाधिकारी उपस्थित होते*

*याप्रसंगी आपले विचार व्यक्त करित हितेश बंन्सोड म्हणाले की “मेल्यावर खांद्या देण्या” ऐवजी जर जिंवत पणी सहकार्याचा व मायेचा हात दिल्यास समाजात परिवर्तन घडविले जाऊ शकते.हितज्योती फाऊंडेशन ग्रामीण भागातच नव्हे शहरी भागातही आपली सेवा देत आहे मग रस्ते अपघात असो कींवा रस्तावर फीरनारे मतीमंद,मनोरुग्णांना आपण आपल्या घरी नेऊण त्यांची आंघोळ घालून त्यांचे कटींग इत्यादी करुण त्यांना नवीन कपडे तसेच त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करुण त्यांचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करुण त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवीण्याकरीता हितज्योती फाऊंडेशन पुढाकर घेते सोबतच हितज्योती फाऊंडेशन द्वारे रोटी बँक स्थापित करुण अनेकांना अन्नदान करण्याकरीता पुढाकार घेत असल्याने अनेकांच्या पोटाची खडगी तर भरतेच सोबतच आजवर शेकडोच्या वर लोकांना त्यांच्या घरी पोहचवीण्याचे कार्य करणार्या हितज्योती फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बंन्सोड व त्यांच्या टीमला त्यांच्या समाजकार्याबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे हे विषेश…

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …