*कन्हान च्या अभिषेक येलमुले ने माॅडलिंग शो मध्ये पटकावले द्वितीय स्थान* *परिसरातील नागरिकां द्वारे अभिषेक येलमुले यांचे अभिनंदन करित कौतुकाचा वर्षाव*

*कन्हान च्या अभिषेक येलमुले ने माॅडलिंग शो मध्ये पटकावले द्वितीय स्थान*

*परिसरातील नागरिकां द्वारे अभिषेक येलमुले यांचे अभिनंदन करित कौतुकाचा वर्षाव*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर ला रितिझ इवेंन्ट द्वारे माॅडलिंग शो कार्यक्रमाचे आयोजन रोझेटा येडीट क्लब येथे करण्यात आले होते. या माॅडलिंग शो मध्ये पिपरी-कन्हान चा रहिवासी अभिषेक अनिल येलमुले या युवकाने द्वितीय स्थान म्हणजे मिस्टर नागपुर अवार्ड प्राप्त करून गोवा येथे होणाऱ्या ग्रँड फिनाले करिता आपले स्थान निश्चित केल्याने परिसरातील नागरिकांने अभिषेक येलमुले यांचे अभिनंदन करित कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.


सोमवार (दि.२४) जानेवारी २०२२ ला रितीझ इवेंन्ट व्दारे रोझेटा येडीट क्लब नागपुर येथे माॅडलिंग शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माॅडलिंग शो मध्ये कन्हान च्या सुत्तम फिटनेस जिम चा शिष्य व पिपरी-कन्हान येथील रहिवासी अभिषेक अनिल येलमुले याने सहभाग घेत उत्तम कामगिरी करित द्वितीय स्थान म्हणजे मिस्टर नागपुर अवार्ड प्राप्त करून गोवा येथे होणाऱ्या ग्रँड फिनाले करिता आपले स्थान निश्चित केल्याने अभिषेक अनिल येलमुले यास आयोजक रोशन वालदे यांनी अवार्ड देऊन सम्मान करीत पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. अभिषेक अनिल येलमुले याने संपुर्ण नागपुर जिल्ह्यात कन्हान-पिपरी शहराचे नाव रोशन केल्याने परिसरातील नागरिका व्दारे अभिषेक येलमुले यांचे अभिनंदन करित कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …