Breaking News

हा निर्णय अजित पवांराचा राष्ट्रवादीचा नव्हे*-शरद पवार *अजित पवारांची राष्ट्रवादी तुन हकालपट्टी होणार का ?*

*हा निर्णय अजित पवांराचा राष्ट्रवादीचा नव्हे*-शरद पवार*

अजित पवारांची राष्ट्रवादी तुन हकालपट्टी होणार का ?*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*महाराष्ट्रात अचानक घडलेल्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी सर्व राजनैतीक तज्ञाचे माथेंच चकरावले व घडलेल्या घटनक्रामामुळे सर्वत्रच विविध चर्चांना पेव फुटत आहेत*

मुंबईभाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे पवारांनी म्हटले आहे.अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.

मग काय राष्ट्रवादीतून अजित पवारांची हकालपट्टी होणार का ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोबतच धनंजय मुंडे यांचे नाव असून 30 ते 35 आमदार राष्ट्रवादीतून फुटल्याचे वृत्त आहे.यासंबधीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार वायबी सेंटर मध्ये 4 वाजताची बैठक आटोपल्यानंतर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमाना दिला आहे.सोबतच 12 वाजता दुपारी शरद पवार,उध्दव ठाकरे यांची सयुंक्त पत्रकार परिषद होणार असल्याचे सांगत त्याठिकाणी भूमिका स्पष्ट होणार असल्याचे सांगितले

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …