Breaking News

*वरोरा येथे एमआईएम चे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*

*वरोरा येथे एमआईएम चे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन अर्थात एमआईएम या पक्षाच्या नागपुर प्रदेश ग्रामीण आणि वरोरा तालुका संपर्क कार्यालय आणि जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन प्रदेश महासचिव कीर्ति डोंगरे यांच्या हस्ते आणि प्रदेश प्रवक्ता व चंद्रपुर, गडचिरोली जिल्हा प्रभारी प्रा. जावेद पाशा यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले! या प्रसंगी प्रा. जावेद पाशा यांनी।स्पष्ट केले की हा राजकीय पक्ष सर्वांसाठी असून संवैधानिक न्याय आणि सहभाग व प्रतिनिधित्व हा पक्षाचा एजेंडा आहे! महासचिव कीर्ति डोंगरे यांनी महिलांचा सहभाग वाधविनण्याबद्दल मार्गदर्शन केले.
रेल्वे स्टेशन रोड, वरोरा येथे स्थापित या जनसंपर्क व जनसेवा कार्यालयातून स्वास्थ कार्ड सेवा, रुग्ण सहकार्य सेवा, मतदान कार्ड सेवा, रेशन कार्ड सेवा, नगरपरिषदेतील आपल्या, जनसमस्या निवारण सेव, तहसील, विभागीय, पंचायत समिति कार्यालयातील जनसमस्या सोडविण्यास सहकार्य सेवा, श्रम कार्ड सेवा, शैक्षणिक मार्गदर्शन व समस्या निवारण सेवा, पुलिस स्टेशन मधील लोकांना येणाऱ्या समस्येसाठी सहकार्य सेवा, महिला, कौटुंबिक समस्या निवारण सेवा, रेशन संम्बधि समस्या निवारण सेवा इत्यादि कार्य, सहकार्य इथे दिल्या जाईल.
लवकरच एमआईएम तर्फे शहराच्या सेवेत एम्बुलेंस सेवा प्रदान करण्याची घोषणा विदर्भ संघटक ताहिरा शेख यानी केली.
या उद्घाटन प्रसंगी विदर्भ महिला संघटक ताहिरा शेख, नागपुर जिल्हा प्रमुख निसार सिद्दीकी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नाहिद हुसैन, गडचिरोली जिल्हाध्यक्ष मक़सूद भाई शेख, गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख मिर्जा वाहाद बेग़, भंडारा जिल्हा संपर्क प्रमुख परवेज़ खान, यवतमाळ संपर्क प्रमुख प्रा.सरफराज नदीम, चंद्रपूर उपाध्यक्ष सैयद अमान हजर होते. यावेळी विविध भागातील 70 लोकांनी पक्षात प्रवेश केला. त्यांचे एमाइएम मधे पुष्पगुच्छ आणि गमछा देउन स्वागत करण्यात आले.
वरोरा शहर अध्यक्ष मोहसीन सैय्यद यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर वरोरा तालुकाध्यक्ष मुजम्मिल शेख यांनी समारोप केला.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एमआईएम चे तालूका अध्यक्ष मूजम्मील शेख, तालूका उपाध्यक्ष जूबेर शेख, तालूका सचिव तोसीफ खान, तालूका सहसचिव निजामूदिन शेख, तालूका संघटक जूबेर खान, शहर अध्यक्ष मोहसीन सैय्यद, शहर उपाध्यक्ष नाहीद शेख, शहर सचिव शफिक शेख, सहसचिव शहबाज शेख, शहर संघटक मोहसीन शेख यांनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …