*पीकअप व्हँनने आटोला उडवीले* *एक महिला गंभीर तर तीघिंना किरकोळ ईजा*

*पीकअप व्हँनने आटोला उडवीले*


*एक महिला गंभीर तर तीघिंना किरकोळ ईजा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – सावनेर वरून मानेगाव येथे स्वयंपाकासाठी 4 महिलांना घेऊन जात असताना ऑटोचालक मनीष सुखदेव भुसारी रा, सावनेर याचा ऑटो गाडी क्र, mh 40 P 0417 या ऑटोला मागून येऊन टाटा मॅजिक छोटा हाथी गाडी क्र mh 40 cd 4113 गाडीने ऑटोस धडक दिली असता, विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर गाडीला Mh 31-CQ-6210 जोरदार धडक लागली त्यामध्ये बसलेले प्रवासी जखमी झाले त्यात कलावती राऊत रा,कोदेगाव वय अंदाजे 60 याचा हाताला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सावनेर येथे प्राथमिक उपचारासाठी सावनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये 108 ने रेफर करण्यात आले, घटनास्थळावरून दोन्ही गाड्या पसार झाल्या, कदाचित विरुद्ध दिशेने येणारा आयसर गाडीने नियमांचं पालन केलं असतं तर कदाचित हा अपघात झाला नसता असे ग्रामस्थाचे म्हणणे आहे*


*तर घटनास्थळी पोहचून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी जखमी कलावती राऊत यांना प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे उपचारासाठी आनुन त्यांच्या घरी माहिती दिली*
*पुढील तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलीस करीत आहे*


*अनेकदा थोडासा फेरा वाचविण्याच्या नादात वाहन चालक विरुद्ध दिशेने आपले वाहन चालवत स्वताचा व ईतरांचा जीव धोक्यात टाकतात या अपघातातही नेमकं हेच घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे.तर विपरीत दिशेने वाहन चालवीणार्या तसेच रस्त्यावर वाहने उभे करुण रहदारीला अडथळा निर्माण करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना वाहतूक विभागास दिल्याची माहीती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दीली*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …