*गोंडेगाव खदान येथुन चोरी केलेला कोळसा ट्रक सह पकडला*

*ट्रक व १५ टन कोळसा सह एकुण २३ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या गोंडेगाव भाटीया बंद कोल वारीच्या पाठीमागे इंदर खुली खदान माती डम्पिंग येथुन दोन आरोपीने आपल्या ट्रक मध्ये गोंडेगाव खुली खदान येथील वेकोलि डम्पींग यार्ड चा दगडी कोळसा चोरून भरून विकण्यास घेवुन जात असतांना आढळुन आल्याने सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करित १५ टन कोळसा सह ट्रक असा एकुण २३ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.२६ जानेवारी २०२२ चे रात्री ९:३० ते १० वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश रामचंद्र पाल वय ४५ वर्ष राहणार न्यु टेकाडी काॅलोनी हे सुरक्षा रक्षक साक्षीदार हे गोंडेगाव कोळसा खुली खदान येथे पेट्रोलिंग करीत असतांना आरोपी १) समीर रफीक खान वय ३४ वर्ष राहणार. गंगानगर नागपुर (२) मिथुन मनी रडार वय ३५ वर्ष राहणार मनसर हे गोंडेगाव खुली खदान येथील वेकोलि कोळसा डम्पींग चा दगडी कोळसा १५ टन अंदाजे ३,००० रुपये प्रति टन ४५,००० रुपयांचा माल चोरून आपल्या ताब्यातील १४ चाकी ट्रक क्रमांक. एम एच ४० सीडी ५०२४ मध्ये भरून विकण्यास घेवुन जात असतांना फिर्यादी ओमप्रकाश रामचंद्र पाल व त्यांचे सुरक्षा रक्षक यांना मिळुन आले . सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना देताच पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून कोळसा व ट्रक आपल्या ताब्यात घेत एकुण २३,४५,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. कन्हान पोलीसांनी फिर्यादी ओमप्रकाश पाल यांचे तक्रारी वरून दोन आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २९/२०२२ कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत असुन आरोपींचा शोध घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज