*ऑटो चे हप्ते थांबल्याने बँकने कर्ज माफ करून ऑटो चालकांना आर्थिक मदतीची मागणी* *विदर्भ ऑटो चालक फेडरेसन च्या शिष्टमंडळाचे प्रादेशिक परीवहन विभागाला निवेदन*

*ऑटो चे हप्ते थांबल्याने बँकने कर्ज माफ करून ऑटो चालकांना आर्थिक मदतीची मागणी*

 

*विदर्भ ऑटो चालक फेडरेसन च्या शिष्टमंडळाचे प्रादेशिक परीवहन विभागाला निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड- १९ च्या महामारी ने लॉकडाऊन काळातील ऑटोचे हप्ते थांबल्याने बँक जप्तीची कारवाई करित असल्याने थांबवुन लॉकडाऊन काळा तींल बँकेचे कर्ज माफ करून ऑटो चालकाना आर्थिक मदतीची मागणी प्रादेशिक परीवहन विभाग नागपुर (ग्रामिण) मा. राजेशजी सराक यांना विदर्भ ऑटो चालक फेडरेसन च्या शिष्टमंडळाने केली आहे.
कोविड -१९ महामारी मध्ये बहुतेक ऑटो चालकांचा व्यवसाय हा प्रभावित होऊन त्यांचावर उपासमारीचे दिवस आले होते. त्यामुळे बॅकेचे कर्ज घेऊन जे ऑटो चालक आपला व्यवसाय करीत होते. त्यांचे लाॅकडाऊन काळातील बॅकेचे हप्ते बाकी असल्याने बॅंके व्दारे ऑटो जप्तीची कार्यवीही सुरू केली आहे. ती कार्यवाई थाबंविण्यात यावी. तसेच कोविड- १९ च्या लॉकडाऊन मधिल हप्ते बॅंक व्दारे माफ करण्यात येऊन. सरकार कडुन प्रत्येक ऑटो चालकांना आर्थिक साहाय्यता म्हणुन दहा हजार रूपये देण्यात यावे. यास्तव विदर्भ ऑटो चालक फेडरेसन उपाध्यक्ष श्री. नरेन्द्रजी वाघमारे यांच्या नेतुत्वात प्रादेशिक परि वहन विभाग नागपुर (ग्राॅमिण) मा. राजेशजी सराक यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात राष्ट्रहित ऑटो युनियन कन्हानचे कार्याध्यक्ष बाळु भाऊ नागदेवे, नरेन्द्र पात्रे, अरल जोसफ, विनोद रंगारी, कैलास कबरागडे, गजु बल्लारे, सुवर्णा गायकवाड, शेखर पेटारे, चंदरू पात्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …