Breaking News

*सरल प्रणाली मधे विद्यार्थ्यांची आधार कार्ड अप डेट करण्यासाठी शाळे मधेच शिबीर लावण्याची मागणी*

*सरल प्रणाली मधे विद्यार्थ्यांची आधार कार्ड अप डेट करण्यासाठी शाळे मधेच शिबीर लावण्याची मागणी*


कोंढाळी-15वर्षे वयोगटा अतील व अन्य शाळेकरीे विद्यार्थी व पाल्यांना सद्य्या आप आपल्या पाल्यांचे आधार कार्ड अप डेट करने या करिता बरीच पाय पिट करावी लागत आहे.

सरल प्रणाली मधे नोंदणी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मधील माहितीची तपासणी करणेबाबद राज्य प्रकल्प संचालक(एम पी एस पी)मुंबई यांचे कार्यालयाकडून परिपत्रक काढले आहे.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती सरल प्रणाली मधे शाळा स्तरावरून मुख्याध्यापकां मार्फत संगणिकृत करण्यात येत आहे.यामधे प्रत्येक विद्यार्थ्यांचे नाव, आई -वडिलाचे नाव ,जात , वय, आधार क्रमांक, लिंग वर्ग, इत्यादी पत्ता जनरल रजिस्टर नंबर इत्यादी माहिती संगणिकृत करण्यात आल्या असूनही सरल प्रणाली मधे विद्यार्थ्यांची माहीती आधार संस्थे कडून तपासून घेत असतांना विद्यार्थींची पटावरील नोंदणी व आधार कार्ड वरील माहिती मध्ये तफावत आढाळून येत आहे. सदर माहिती जिल्हा/तालुक्यातील अधिकार्यांमार्फत तपासणी करून बदल करायचे असल्यास सरल प्रणाली मधे बदल करण्यास संबधीत मुख्याध्यापकांना सूचना देण्याच सांगितले असल्याने, संबधित शाळांचे मुख्याध्यापकानी आप आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मधे तांत्रिक चूका आहेत त्या दुरूस्ती करन्याचा सोबतच जे शाळेकरी विद्यार्थी 15वर्ष व कमी वयाचे विद्यार्थ्यांना दर पाच वर्षांनी आपले आधार अपडेट करने गरजेचे असल्याचे सांगितल्याने संबधित पालकांची मोठी धावपळ होत आहे.


ग्रामीण भागात आधीच आधार सेवा केंद्र फारच कमी आहेत. यातही पालकांचे वेळ-श्रम-धन खर्चूनही आपल्या पाल्यांचे आधार कार्ड अप डेट करण्यात त्रास होत असल्याने राज्य सरकारने कोरोना काळात शाळेकरी विद्यार्थ्थांचे आधार अप डेट करण्या साठी शाळांमधेच आधार अपडेट शिबीर लावण्याची मंजुरी द्यावी अशी मागणी पालकांनी व शाळांचे मुख्याध्यापक वर्गाकडून होत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …